तुफान राड्यानंतर भाजपसमोर राष्ट्रवादी चारीमुंड्या चित, जिंतूर औद्योगिक वसाहत निवडणुकीत बोर्डीकर गटाचा विजय

| Updated on: Feb 28, 2022 | 2:22 PM

जिंतूर औद्योगिक वसाहतीच्या संचालकपदाच्या 13 पैकी 12 जागांवर भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर गटाने विजय मिळवला आहे

तुफान राड्यानंतर भाजपसमोर राष्ट्रवादी चारीमुंड्या चित, जिंतूर औद्योगिक वसाहत निवडणुकीत बोर्डीकर गटाचा विजय
Follow us on

 नजीर खान| परभणीः  रविवारी तुफान राडा झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील (Parbhani Politics) जिंतूर औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या (Jintur Rada) निवडणुकीत राष्ट्रवादीची धूळधाण करत भाजपने दणदणीत विजय मिळावला. या निवडणूकीत सर्वच्या सर्व 11 जागांवर भाजप विजयी झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथील एकूण 13 सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक (Jintur BJP Vs NCP) होती. त्यापैकी एका अनुसूचित जाती व जमातीच्या जागेसाठी उमेदवार मिळाला नव्हता तसेच एक जागा बिनविरोध निवडली गेली. त्यामुळे उर्वरीत 11 जागांसाठीच्या निवडणुकीत भाजपची सरशी झाल्याचे दिसून आले.

रविवारी जिंतूरमध्ये तुफान राडा

रविवारी परभणी जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे या दोन बड्या नेत्यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. जिंतूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मतदान केंद्रावर जिंतूर औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया सुरु होती. या मतदान प्रक्रियेसाठी ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी खासदार विजय भांबळे हे स्वतः उपस्थित होते. यावेळी दोन्ही गट मतदान केंद्राच्या बाहेर तळ ठोकून होते. मात्र मतदान केंद्राच्या आवारात 100 मीटरच्या आत का आलात, असा सवाल करत बोर्डीकर गटाने भांबळे गटावर आक्षेप घेतला. या प्रश्नावरून वाद सुरु झाला आणि वादाचे रुपांतर तुफान हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी मारहाण, दगडफेक सुरु झाली. त्यामुळे मतदान केंद्रात काही काळ तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस दाखल झाले. जमावाची पांगवा पांगव करण्यात आली. त्यानंतर जिंतूरमधले वातावरण काही काळ तणावाचे होते.

भाजपच्या बोर्डीकर गटाचे वर्चस्व

दरम्यान, जिंतूर औद्योगिक वसाहतीच्या संचालकपदाच्या 13 पैकी 12 जागांवर भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर गटाने विजय मिळवला आहे. येथील 13 जागांपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी उमेदवार न मिळाला नाही तसेच एक जागा बिनविरोध होती. त्यामुळे 11 जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. यात सर्वच 11 जागांवर भाजपचा विजय झाल्याचे घोषित झाले. या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात विजयी मिरवणूक काढली.

इतर बातम्या-

Latur Market : सोयाबीन दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती, काय आहे बाजारपेठेतले चित्र?

मोहित कंबोज आणि त्यांच्या कुटुंबियांना धोका, तत्काळ सुरक्षा पुरवावी, भाजप आमदार अमित साटम यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र