AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकरांच्या गटाचे वर्चस्व

आघाडीत बिघाडी झाली, तरी देखील निकालाअंती आमदार दुर्राणी यांनी दिलेली साथ सध्या तरी बोर्डीकरांना सत्ता मिळवून देऊ शकली नाही. (Parbhani District Central Bank Election)

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकरांच्या गटाचे वर्चस्व
Parbhani District Central Bank Election
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 23, 2021 | 4:39 PM
Share

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार सुरेश वरपूडकर यांच्या गटातील 11 सदस्य विजयी झाले. तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाकडे 9 जागा आल्या आहेत. गणेशराव रोकडे हे अपक्ष निवडून आले आहेत. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील पाच आमदार, दोन माजी आमदार आणि एक माजी खासदार यांचा समावेश आहे. (Parbhani District Central Bank Election)

वरपूडकर गटातून कोणकोण विजयी?

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची आज शहरातील कल्याण मंडपम्‌ येथे मतमोजणी झाली. यामध्ये आमदार सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलचे परभणीतून आमदार सुरेश वरपूडकर, सोनपेठमधून राजेश विटेकर, औंढ्यातून राजेश पाटील गोरेगावकर, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया गटातून माजी आमदार सुरेश देशमुख, वसमतमधून आमदार चंद्रकांत नवघरे, महिला प्रतिनिधी गटातून प्रेरणा समशेर वरपूडकर, अनुसूचित जाती गटातून अतुल सरोदे तर इतर मागास प्रवर्ग गटातून भगवान वाघमारे विजयी झाले आहेत.

बोर्डीकर यांच्या गटाला 9 जागा

मानवत गटातून पंडितराव चोखट तर पूर्णा गटातून बालाजी देसाई आणि सेनगावमधून साहेबराव पाटील गोरेगावकर हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 21 पैकी 11 जागा वरपूडकर गटाने पटकावल्या. तर भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये सेलूतून आमदार मेघना बोर्डीकर, महिला प्रतिनिधी गटातून भावना रामप्रसाद बोर्डीकर, कळमनुरीतून माजी खा. शिवाजी माने, इतर शेती संस्था गटातून आनंदराव भरोसे हे विजयी झालेत.

ईश्वर चिठ्ठीने निकाल

विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघात वरपूडकर गटाचे ॲड. स्वराजसिंह परिहार आणि बोर्डीकर गटाचे दत्ता मायंदळे यांना 761 इतकी समसमान मतं मिळाली होती. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये मायंदळे यांच्या बाजूने कौल लागल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या गटाचे यापूर्वीच जिंतूरमधून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, गंगाखेडमधून भगवानराव सानप, पाथरीतून आमदार बाबाजानी दुर्राणी, हिंगोलीतून आमदार तानाजी मुटकुळे हे बिनविरोध निवडले गेले आहेत. पालम गटातून अपक्ष गणेशराव रोकडे विजयी झाले आहेत. (Parbhani District Central Bank Election)

दुर्राणींच्या साथीनेही बोर्डीकरांना सत्ता नाही

दरम्यान, जिल्हा बँक वरपूडकर गटाने त्यांच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. वरपूडकर यांनी महाविकास आघाडी या निवडणुकीत स्थापन केली होती. परंतु राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी एका जागेवरुन बोर्डीकर गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली, तरी देखील निकालाअंती आमदार दुर्राणी यांनी दिलेली साथ सध्या तरी बोर्डीकरांना सत्ता मिळवून देऊ शकली नाही.

संबंधित बातम्या 

बीड जिल्हा बँक निवडणुकीत पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का, महाविकास आघाडीची सरशी

बीड जिल्हा बँक निवडणूक, परळी मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, पंकजा मुंडे घटनास्थळी

(Parbhani District Central Bank Election)

Follow Us
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा