Raj Thackeray Aurangabad : राज ठाकरेंच्या ‘भोंग्याची’ हवा काढण्याचा प्रयत्न? औरंगाबाद पोलीसांच्या त्या तीन अटी, ज्या राजना पाळणे मुश्किल?

| Updated on: Apr 28, 2022 | 9:23 PM

पोलीसही (Aurangabad Police) सर्व बाबींची पडताळणी करूनच परवानगी देण्याच्या पवित्र्यात होते. आता सभेला परवानगी जरी मिळाली असली तरी पोलिसांकडून काही काटेकोर अटीशर्ती घालून देण्यात आल्या आहेत. त्या अटीशर्थीतील तीन अटीशर्थी राज ठाकरे यांना पाळणे अवघड आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

Raj Thackeray Aurangabad : राज ठाकरेंच्या भोंग्याची हवा काढण्याचा प्रयत्न? औरंगाबाद पोलीसांच्या त्या तीन अटी, ज्या राजना पाळणे मुश्किल?
राज ठाकरेंची जबरदस्त अंदाजात एन्ट्री होणार
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबाद : राज ठाकरेंची (Raj Thackeray) तोफ औरंगाबादच्या मैदानात विरोधकांविरोधात (Aurangabad Mns) धडाडणार हे आता निश्चित झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सभेच्या परनवागी बाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र औरंगाबाद पोलिसांनी सभेला अखेर परवानगी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही सभा चर्चेत आहे. या सभेच्या परवानगीसाठी मनसे नेत्यांची फौज मैदानात उतरली होती. अनेक संघटनांकडून या सभेला विरोध करण्यात आला होता, तसेच धार्मक तेढ निर्माण होण्याचे कारण देण्यात येत होते.  त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीसही (Aurangabad Police) सर्व बाबींची पडताळणी करूनच परवानगी देण्याच्या पवित्र्यात होते. आता सभेला परवानगी जरी मिळाली असली तरी पोलिसांकडून काही काटेकोर अटीशर्ती घालून देण्यात आल्या आहेत. त्या अटीशर्थीतील तीन अटीशर्थी राज ठाकरे यांना पाळणे अवघड आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

त्या तीन काटेकोर अटी कोणत्या?

  1. यातली पहिली अवघड अट अशी ही या सभेवेळी वापरण्यात येणारे ध्वनीक्षेपक बाबत सर्वोच्चे न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करने बंधनकारक असेल. म्हणजेच औद्योगिक क्षेत्रात 75 डेसीबल, व्यापारी क्षेत्रात, 65 डेसीबल, निवासी क्षेत्रात 55 डेसीबल, आणि शांतता क्षेत्रात 50 डेसीबल. आता राज ठाकरे बोलोयला उभा राहिले की त्यांनी आवाजी मर्यादा कोणत्या आधारे पाळायची हाही एक प्रश्नच आहे. कारण राज ठाकरेंचा धडाडणारा आवाज आहे, म्हणूनच त्यांना धडडणारी तोफ म्हणलं जातं.
  2. या सभेसाठी दुसरी मोठी अट अशी घालण्यात आली आहे की या सभेसाठी फक्त 15 हजार लोकांना बोलवता येणार आहे. मात्र राज ठाकरेंची सभा म्हटलं की मैदानं तुडुंब भरतात. तसेच परराज्यातून जसे की आयोध्येतूनही काही हजारांमध्ये लोक या सभेसाठी येणार आहेत. अशा वेळी ही मर्यादा पाळणे हेही आव्हान असणरा आहे.
  3. यातली तसरी मोठी अट म्हणजे जातीय तेढ निर्माण होऊ नये आणि प्रक्षोभक भाषण होऊ नये, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या सभेला अनेक संघटनांनी विरोध केला होता, राज ठाकरे यांच्या भाषणामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल असा आरोप या संघटनांकडून करण्यात आला होता. सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, धर्म, भाषा, वर्ण, प्रदेश जन्मस्थान, धर्म यावरून चिथावणीखोर वक्तव्य करू नये, असे सांगण्यात आले आहे, मात्र राज ठाकरेंची शिवतिर्थावरील सभा पाहिली आणि त्यानंतरही भोंग्यांबाबत भूमिका पाहिली तर ही अटही राज ठाकरे हे कशी पाळणार हाही प्रश्नच आहे.