Video : शहरातील एमजीएम कॉलेज परिसरात टोळक्याचा राडा, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ

| Updated on: Apr 09, 2022 | 8:28 AM

औरंगाबाद (Aurangabad) शहरात एमजीएम कॉलेज (MGM College) परिसरात कॉलेजमध्ये अनेकदा राडा झाल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळतं. परंतु काल घडलेला प्रकार अत्यंत भयानक होता. दुपारच्या सुमारास कॉलेज परिसरात एक जमाव रस्त्यावर उभा आहे. आपआसात एकमेकाला दमदाटी करत आहेत.

Video :  शहरातील एमजीएम कॉलेज परिसरात टोळक्याचा राडा, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ
शहरातील एमजीएम कॉलेज परिसरात टोळक्याचा राडा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद – औरंगाबाद (Aurangabad) शहरात एमजीएम कॉलेज (MGM College) परिसरात कॉलेजमध्ये अनेकदा राडा झाल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळतं. परंतु काल घडलेला प्रकार अत्यंत भयानक होता. दुपारच्या सुमारास कॉलेज परिसरात एक जमाव रस्त्यावर उभा आहे. आपआसात एकमेकाला दमदाटी करत आहेत. त्याच्यापैकी एका तरूणाच्या हातात काठी आहे. तो काठी हातात घेऊन जमावाला दमदाटी करतोय. तसेच एका तरूणाला त्याने मागच्या बाजून काठी सुध्दा मारली आहे. त्यावेळी तिथून एक बाईक चालक निघत असताना काठीवाला तरूण त्यांच्या बाईकवरती जोरात काठी मारत आहे. हा नेमका राडा कशामुळे झाला हे उद्याप समजलेलं नाही. परंतु झालेल्या प्रकाराचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. औरंगाबाद पोलिस (Aurangabad Police) यावर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये

कॉलेज परिसरात राडा झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ आहे. काल झालेल्या राड्यामुळे कॉलेजमध्ये कशा पद्धतीने दहशत माजवली जाते, हे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. एका जमावात लागलेल्या राड्यात एकमेकांना मारहाण करीत आहेत. पांढरा शर्ट घातलेला तरूण इतर तरूणांना हातात काठी घेऊन मारहाण करीत आहे. तसेच त्या तरूणाने एकाची बाईक सुध्दा काठीने फोडली आहे. एमजीएम कॉलेज परिसरात गावगुंडाचा नेहमीच होतो. पण काल झालेला प्रकार भयानक आहे. एक तरूण दुसऱ्या तरूणाच्या अंगावर मोठा दगड मारत असल्याचे दिसत आहे.

औरंगाबाद पोलिसांचं तरूणांना भय नाही

दिवसाढवळ्या कॉलेज परिसरात तरूणांच्यामध्ये राडे होत आहेत. पण कारवाई करून सुध्दा असे राडे पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत असे अनेक राडे झाले आहेत. परंतु तरूण कारवाईला घाबरत नसल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका; आरबीआयची अ‍ॅक्सिस, आयडीबीआय बँकेवर कारवाई

Nagpur Shiv Sena | वरुण सरदेसाईंचा दावा फोल, शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर, दोघांच्या नेतृत्वात दोन आंदोलनं

आज महाअष्टमीच्या दिवशी होणार महागौरीची पूजा, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व