एक महिला 15 वर्षे पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही, औरंगाबादेत रावसाहेब दानवेंची इंदिरा गांधींवर टीका

| Updated on: Mar 02, 2022 | 4:06 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि घराघरातील चुलीसमोर बसलेल्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 100 रुपयात गॅस उपलब्ध करून दिला. आज औरंगाबादमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घराघरात पाइपलाइनच्या माध्यमातून गॅस उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचा शुभारंभ होत आहे, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं.

एक महिला 15 वर्षे पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही, औरंगाबादेत रावसाहेब दानवेंची इंदिरा गांधींवर टीका
औरंगाबादेत मंत्री रावसाहेब दानवे यांची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर नाव न घेता टीका
Follow us on

औरंगाबादः एक महिला 15 वर्षे देशात पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सत्तेत आले आणि पहिल्या पाचच वर्षात महिलांचं दुःख दूर केलं, असं वक्तव्य करत रावसाहेब दानवे यांनी आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यावर टीका केली.  भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आज औरंगाबादेत बोलताना हे वक्तव्य केलं. शहरातील गॅस पाइप लाइन कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली आज औरंगाबाद शहरात गॅस पाइप लाइनच्या कामाचा शुभारंभ होत असून येत्या काही वर्षात घरोघरी पाइपद्वारे गॅस पोहोचेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आळा होता.

इंदिरा गांधींबाबत काय म्हणाले दानवे?

शहरातील गॅस पाइपलाइनच्या उद्घाटन कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, एक महिला देशात 11 वर्ष पंतप्रधान होती. पण महिलांचं दुःख तिनं समजून घेतलं नाही. फक्त चूल आणि मूल हेच महिलांचं काम आहे, असं त्यांना वाटत होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि घराघरातील चुलीसमोर बसलेल्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 100 रुपयात गॅस उपलब्ध करून दिला. आज औरंगाबादमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घराघरात पाइपलाइनच्या माध्यमातून गॅस उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचा शुभारंभ होत आहे, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं.

शहरातील गॅस पाइपलाइनच्या कामाचं थाटात उद्घाटन

औरंगाबाद शहरातील तब्बल दोन लाख कुटुंबांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याच्या योजनेचे आज औरंगाबाद मध्ये उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आलं. औरंगाबाद शहरात तब्बल 60 किलोमीटर अंतरापर्यंत ही गॅस पाईपलाईन असेल. येत्या सहा महिन्यात औरंगाबाद शहरातल्या पहिल्या ग्राहकाला गॅस लाईन द्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे तर येत्या दोन वर्षात तब्बल दोन लाख नागरिकांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे, असं आश्वासन भाजपच्या वतीने देण्यात आलं आहे. या योजनेचे आज औरंगाबाद शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्घाटन करण्यात आले. यावेळी तब्बल 10 हजार नागरिकांनी गर्दी केली होती, मात्र औरंगाबाद शहरातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

इतर बातम्या-

Breaking News: तिसरं महायुद्ध हे अणूयुद्ध असेल, पुतिनचे इरादे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याकडून जाहीर

Nagpur | पतंजली उद्योगाचे उत्पादन लवकरच सुरू होणार, मिहानमधील विकासकामाबाबत दीपक कपूर काय म्हणाले?