Nagpur | पतंजली उद्योगाचे उत्पादन लवकरच सुरू होणार, मिहानमधील विकासकामाबाबत दीपक कपूर काय म्हणाले?

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांची मिहानला भेट दिली. पतंजली उद्योग समूहाने मिहानमधील आपल्या प्रकल्पात पुढील तीन आठवड्यांत प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात करण्याचे आश्वासन कपूर यांना दिले आहे.

Nagpur | पतंजली उद्योगाचे उत्पादन लवकरच सुरू होणार, मिहानमधील विकासकामाबाबत दीपक कपूर काय म्हणाले?
मिहानचा आढावा घेताना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष दीपक कपूर.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 3:46 PM

नागपूर : दीपक कपूर (Deepak Kapoor) यांनी सोमवारी मिहान येथे दिवसभर घेतलेल्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये विविध कंपन्या, व्यापारी संघटना व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. नागपूरसह विदर्भासाठी ग्रोथ इंजिन (Growth Engine for Vidarbha) ठरत असलेल्या मिहान प्रकल्पाला गतिशील करण्यासाठी सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा. अडचणी विना तोडगा ठेवू नका, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी मिहानमध्ये विविध कंपन्यांच्या सुरू असलेल्या विकासकामांचा काल दिवसभर आढावा घेतला. यावेळी श्री. कपूर यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (Maharashtra Airport Development Company) अधिकारी, मिहान इंडिया लिमिटेडचे अधिकारी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अधिकारी, विविध शिष्टमंडळासोबत स्वतंत्ररित्या विस्तृत बैठका घेतल्या. मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन आणि मिहानच्या विविध वेंडर यांना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेतले. तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.

तीन आठवड्यांत उत्पादनास सुरुवात होणार

स्टार हॉटेल प्रकल्पासाठी 6.79 एकर जमीन घेतलेल्या गुंतवणूकदाराशीही कपूर यांनी चर्चा केली. सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच बांधकाम सुरू करण्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भेटीत त्यांनी नागपूरसाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या 234 एकर विस्तीर्ण जागेत तयार होत असलेल्या पतंजली उद्योग समुहासोबतही चर्चा केली. पतंजली फूड अँड हर्बल पार्कचे महाव्यवस्थापक डी. जी. राणे यांच्याशी त्यांची चर्चा झाली. पतंजली फूड पार्कमध्ये फ्लोअर मिल सुरू करण्याचे काम पूर्णत्वास आले असल्याची माहिती श्री. राणे यांनी दिली. सर्व मशिनरी पोहचल्या आहेत. अंतर्गत रस्ते बांधणीचे कामही जोरात सुरू आहे. फॅक्टरी हँगरमध्ये प्लास्टरिंगचे काम पूर्णत्वास आले आहे, फ्लोअरिंग आणि पेंटिंगचे काम लवकरच सुरू होईल आणि 2-3 आठवड्यांत, महिनाभरात उत्पादन सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

नवीन गुंतवणूकदार आकर्षित

मिहान प्रकल्पातील इतर पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा आणि इतर विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेतला. श्री कपूर यांनी मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत आमदार टेकचंद सावरकर यांच्यासोबत बैठक घेतली. त्यांनी सावरकरांना आश्वासन दिले की, मिहान प्रकल्प बाधित खापरी गावातील प्रकल्पग्रस्तांसाठी वाढीव भरपाई आणण्यासाठी विमानतळ विकास कंपनी आवश्यक ती कार्यवाही करेल. आरोग्य, विमान वाहतूक, फार्मास्युटिकल्स, ऍग्रो, आयटी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काही नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे.

खारकीवमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल! अमरावतीतील आई-वडील चिंतेत

Nagpur Crime | भरदिवसा कार्यालयात काढली तलवार! तीन लाख घेऊन आरोपी पळाले, नागपुरात नेमकं काय घडलं?

Chandrapur : जास्त मूल्यांकन करून कर्जवाटप, स्टेट बँकेतील तीन अधिकाऱ्यांना अटक, आणखी कुणाकुणावर कारवाई?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.