औरंगाबाद महापालिका निवडणूकः प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्यासाठी उरले फक्त 10 दिवस!

| Updated on: Nov 09, 2021 | 2:32 PM

औरंगाबाद महापालिकेत याआधी 115 सदस्य संख्या होती. मात्र राज्य सरकारच्या निर्णयानुसार, सदस्यसंख्या आता 126 पर्यंत पोहोचली आहे. तसेच या दृष्टीने शहरात एकूण 42 प्रभाग तयार होतील.

औरंगाबाद महापालिका निवडणूकः प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्यासाठी उरले फक्त 10 दिवस!
प्रभाग रचना आराखडा 18 नोव्हेंबरपर्यंत तयार करण्याची मुदत
Follow us on

औरंगाबादः महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी सुधारित आदेश जारी केले आहेत. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेकरिता येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता आराखडा तयार करण्यासाठी महालिकेकडे फक्त 10 दिवस बाकी आहेत.

126 सदस्य संख्या 42 प्रभाग

औरंगाबाद महापालिकेत याआधी 115 सदस्य संख्या होती. मात्र राज्य सरकारच्या निर्णयानुसार, सदस्यसंख्या आता 126 पर्यंत पोहोचली आहे. तसेच या दृष्टीने शहरात एकूण 42 प्रभाग तयार होतील. महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम पन्नास टक्के पूर्ण केले आहे. उर्वरीत पन्नास टक्के काम पुढील दहा दिवसात प्रशासनाला करावे लागणार आहे.

2011 च्या जनगणनेनुसार रचना

प्रभाग रचनेसाठी महापालिकेने 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 एवढी गृहित धरली असून यात मागील दहा वर्षात झालेली नैसर्गिक वाढ गृहित धरून प्रभाग तयार करावे लागतील. 2011 मधील जनगणनेचे प्रगणक गट केंद्रबिंदू मानून प्रभाग तयार होतील. संबंधित प्रभागातील वाढीव लोकसंख्या 10 टक्के गृहित धरली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण वाढीव लोकसंख्या गृहित घरली तर जुन्या वॉर्डांच्या सीमारेषा बदलू शकतात. त्यामुळे महापालिकेला तीन वॉर्डांच्या सीमारेषा लक्षात घेून प्रभाग तयार करावा लागणार आहे. त्यातही निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले कडक निकष डोळ्यासमोर ठेवावे लागणार आहेत.

प्रभाग रचनेवर राजकीय मंडळींचे लक्ष

महापालिकेत मागील तीन दशकांपासून सलग विजय मिळवणाऱ्या तगड्या मंडळींचे प्रभाग रचनेच्या कामकाजाकडे बारकाईने लक्ष आहे. आपल्या सोयीनुसार, प्रभाग तयार करता येऊ शकतो का, या दृष्टीने या मंडळींनी सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. मागील महिन्यात मनपाने जेव्हा आराखडा तयार करण्याचे काम सुरु केले, तेव्हासुद्धा या मंडळींनी हस्तक्षेपाचे प्रयत्न केल्याचे समजले आहे.

इतर बातम्या-

हिणकस शब्दाचं सोन्याशी काय नातं? वाचा Gold Gyaan मध्ये अन् सोबत औरंगाबादचे सोन्याचे भावही!

आनंदवार्ताः मंदीचे मळभ हटले, पर्यटकांनी बहरली औरंगाबादची अजिंठा लेणी, 3 दिवसात 8 हजारांवर पर्यटक