आनंदवार्ताः मंदीचे मळभ हटले, पर्यटकांनी बहरली औरंगाबादची अजिंठा लेणी, 3 दिवसात 8 हजारांवर पर्यटक

दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्रथमच अजिंठा लेणीला भेट देणाऱ्यांची संख्या अचानक वाढून गेली. त्यामुळे कोरोना संकटामुळे अत्यंत मंद झालेला पर्यटन व्यवसायालाही तेजी आल्याचे चित्र दिसून आले.

आनंदवार्ताः मंदीचे मळभ हटले, पर्यटकांनी बहरली औरंगाबादची अजिंठा लेणी, 3 दिवसात 8 हजारांवर पर्यटक
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 4:24 PM

औरंगाबादः मागील दीड वर्षानंतर प्रथमच औरंगाबादमधील अजिंठा लेणी (Ajintha Caves) पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे रविवारी दिसून आले. दिवाळी आणि त्याला लागून आलेल्या सुट्यांमुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात 08 हजार 415 पर्यटकांनी (Aurangabad Tourism) अजिंठा येथील लेणीला भेट दिली. पर्यटक आल्यामुळे पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्त्व विभाग व राज्य परिवहन महामंडळाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त झाला. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षांपासून पर्यटन व्यवसायावर घोंगावणारे मंदीचे सावट आता लवकरच दूर होईल, असेच चित्र रविवारी दिसून आले.

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका

मागील दोन वर्षांपासून जगभरात कोरोना संसर्गाचे थैमान सुरु होते. त्यामुळे सर्वाधिक फटका बसला तो पर्यटन व्यवसायाला. औरंगाबादमधील अजिंठा लेणीतील पर्यटन व्यवसाय प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला होता. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर अजिंठा लेणी पर्यटकांसाठी नियमित खुली करण्यात आली असली तरीही पर्यटकांकडून हवा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे यंदाच्या हंगामावरही कोरोनाचे सावट राहते की काय, अशी भीती पर्यटन व्यावसायिकांना भेडसावत होती. दरम्यान, या हंगामात शुक्रवारपासून प्रथमच अजिंठा लेणीच्या भेटीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत अचानक वाढ दिसून आली. शुक्रवारी 1 हजार 960 पर्यटक शनिवारी 2 हजार 445 पर्यटक तर रविवारी 04 हजार 10 पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिली. म्हणजेच तीन दिवसात पर्यटकांनी आठ हजारांचा टप्पा ओलांडला. पर्यटन महामंडळाच्या वाहन तळावर वाहनांच्या सकाळपासूनच रांगा लागलेल्या दिसून आल्या.

पर्यटन महामंडळाचे वाहनतळ हाऊसफुल्ल

रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत पर्यटन महामंडळाचे फर्दापूर-अजिंठा लेणी टी-पॉइंट येथील वाहनतळ हाऊस फुल्ल झाले होते. त्यामुळे पर्यटन महामंडळाच्या पर्यटक निवास स्थानाजवळील मोकळ्या मैदानात पर्यटकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली. ही माहिती पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक रामदास क्षीरसागर यांनी दिली.

एसटी संपाचा पर्यटनावर परिणाम नाही

पर्यटकांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सोयगाव आगाराने रविवारी अजिंठा लेणीत 09 विना वातानुकूलित व दोन वातानुकूलित अशा एकूण 11 प्रदूषणमुक्त बसेस तसेच 11 चालक, 7 वाहक व 1 वाहतूक नियंत्रक असे एकूण 19 कर्मचारी तैनात ठेवले होते. त्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी असूनही रविवारी अजिंठा लेणीत वाहतूक सेवा अत्यंत सुरळीत झाल्याचे दिसून आले.

इतर बातम्या-

जागेचं अधिग्रहणच नाही, तर कारवाई कसली करताय? औरंगाबादच्या सर्वात मोठ्या वादाचा Ground Report

औरंगाबाद महापालिका आता फक्त इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करणार, डिझेल, पेट्रोल वाहनांची खरेदी बंद!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.