Uddhav Thackeray | आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही, आपला धर्म घरात ठेवा, मुख्यमंत्र्यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण

| Updated on: Jun 08, 2022 | 9:15 PM

बाबरी मशिद पाडल्यानंतरची आठवण सांगत त्यांनी मोरेश्वर सावे यांची आठवण सांगितली.यावेळी देवेंद्र फडणवीस हे गेले होते की नाही माहिती नाही मात्र शिवसैनिक बाबरी आंदोलनावेळी तिथे गेला होता. त्याची माहिती मोरेश्वर सावे यांच्याकडून घ्या असंही त्यांनी सांगितली.

Uddhav Thackeray | आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही, आपला धर्म घरात ठेवा, मुख्यमंत्र्यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण
आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही, आपला धर्म घरात ठेवा, मुख्यमंत्र्यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण
Follow us on

औरंगाबादः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आक्रोश सभेवर जोरदार हल्लाबोल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादमधील सभेला (Aurangabad Meeting) सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाना साधत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदोर टीका केली. भाजपकडून ज्या प्रकारे धर्माचे राजकारण केले जात आहे, त्याप्रकारचे राजकारण शिवसेना करणार नाही असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगितली. यावेळी भाजप प्रवक्त्यांनी इतर धर्मावर केलेली टीका, आणि त्यांच्यावर झालेली कारवाईचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही, आपा धर्म घरात ठेवा असं बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हाला सांगितली आहे.

त्यामुळे आम्ही मशिदीखाली शिवलिंग आहे की आणि दुसरं काय आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही असंही त्यांनी सांगितले.

शिवसैनिक बाबरी आंदोलनावेळी तिथे गेला

बाबरी मशिद पाडल्यानंतरची आठवण सांगत त्यांनी मोरेश्वर सावे यांची आठवण सांगितली.यावेळी देवेंद्र फडणवीस हे गेले होते की नाही माहिती नाही मात्र शिवसैनिक बाबरी आंदोलनावेळी तिथे गेला होता. त्याची माहिती मोरेश्वर सावे यांच्याकडून घ्या असंही त्यांनी सांगितली.

बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली

यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेले बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे असं वक्तव्य केलेल्य वक्तव्याचीही त्यांनी आठवण करुन दिली.

आक्रोश मोर्चावर कडाडून टीका

आक्रोश मोर्चावर त्यांनी कडाडून टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचं हिंदूत्व फक्त भगवं नाही तर आमचं भगवा हा वारकऱ्यांचा आहे, हिंदुत्वाचा आहे आणि माझ्या शिवसैनिकांचा आहे असा टोला लगावत त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.