ऐन सणासुदीत भाज्यांचे दर कडाडले, मेथी-पालकाची जुडी 25 रुपयांवर, वाचा औरंगाबादचे भाव

| Updated on: Oct 17, 2021 | 5:52 PM

औरंगाबादः ऐन सणासुदीत भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याने तर डोळ्यात पाणी आणल्याचे चित्र आहे. कांद्याचा भाव दर दिवसाला वाढताना दिसत आहे. रविवारी किरकोळ बाजारात कांद्याचा दर किलोमागे 50 रुपयांवर पोहोचला होता. तर नव्या लाल कांद्यांचा दरही 40 रुपये किलो एवढा झाला होता. तसेच किराणा वस्तूंसह इतर भाज्यांचे भावही सध्या चांगलेच वधारलेले दिसत आहेत. जाधववाडी […]

ऐन सणासुदीत भाज्यांचे दर कडाडले, मेथी-पालकाची जुडी 25 रुपयांवर, वाचा औरंगाबादचे भाव
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः ऐन सणासुदीत भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याने तर डोळ्यात पाणी आणल्याचे चित्र आहे. कांद्याचा भाव दर दिवसाला वाढताना दिसत आहे. रविवारी किरकोळ बाजारात कांद्याचा दर किलोमागे 50 रुपयांवर पोहोचला होता. तर नव्या लाल कांद्यांचा दरही 40 रुपये किलो एवढा झाला होता. तसेच किराणा वस्तूंसह इतर भाज्यांचे भावही सध्या चांगलेच वधारलेले दिसत आहेत.

जाधववाडी मंडीत रविवारचे दर

कोरोनामुळे अनेक कुटुंबाचे आर्थिक बजेट कोलमडलेले आहे. त्यातच सणासुदीत नव्या उत्साहाने काही करायला गेल्यास महागाईमुळे प्रचंड दरवाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना कमी झाल्याचा आनंद साजरा करायला निघालेल्या नागरिकांना भाववाढीमुळे पुन्हा घराकडे माघारी फिरण्याची वेळ येत आहे. भाजीमंडईत रविवारचे दर पुढीलप्रमाणे दिसून आले.

कांदा- 60 रुपये प्रति किलो
पत्ता कोबी- 50 ते 60 रुपये प्रति किलो
भेंडी- 70 ते 80 रुपये प्रति किलो
गवार- 90 ते 100 रुपये प्रति किलो
टोमॅटो- 60 ते 80 रुपये प्रति किलो
पालक, मेथी, कोथिंबीरीची जुडी- 20 ते 25 रुपये
लसूण- 90 ते 100 रुपये प्रति किलो
अद्रक – 40 ते 50 रुपये प्रति किलो

कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता नाही

बाजार समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवा कांदा अजून बाजारात हवा त्या प्रमाणात दाखल झालेला नाही. त्याामुळे जुन्या कांद्याचे दर वाढले आहेत. त्यातच अवकाळी पावसाने लासलगाव बाजार समितीतील कांदा सडला आहे. त्यामुळेही आवक मंदावली आहे. दुसरीकडे कांद्याची मागणी वाढत असल्याने दरही वाढले आहेत. अजून काही दिवस तरी कांद्याचे दर कमी होण्याची चिन्हे नाहीत.

नाशिकमध्ये पावसाळी कांद्याच्या लिलावाला प्रारंभ

उमराणे (जि. नाशिक) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन लाल असणाऱ्या पावसाळी कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफणा यांच्यासह कांदा व्यापारी उपस्थित होते. यावेळी उमराणे येथील शेतकरी रणजीत देवरे यांनी आणलेल्या कांद्याला क्विंटलमागे सर्वोच्च 5151 रुपयांचा भाव मिळाला. यावेळी शेतकरी देवरे यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. अजून महिनाभर तरी लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे या कांद्याचे दर तेजीत राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे या वर्षी पावसाने जोरदार थैमान घातले आहे. त्याचा फटका लाल कांद्यालाही बसला. त्यामुळे बाजारात या कांद्याची आवक तशीही कमी आहे. सध्या उमराणे बाजार समितीमध्ये या कांद्याची जवळपास एक हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे. त्यात सर्वात जास्त भाव हा 5151 मिळाला असून, सर्वात कमी भाव 1100 रुपये इतका मिळाला आहे. तर सरासरी 2700 रुपयांनी कांद्याची विक्री झाल्याचे समजते. नाशिक जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे यंदा इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा फटका कांद्यालाही बसला आहे. खरिपासह या भागातील फळबागांचे नुकसान झाले आहे. मात्र, सध्या तरी लाल कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हासू आले आहे.

 

इतर बातम्या- 

माझ्या मृत्यूसाठी मनोज पवार जबाबदार… औरंगाबादेत व्हिडिओ व्हायरल करत कामगाराची आत्महत्या, मनोजच्या अटकेसाठी नातेवाईक आक्रमक

तो हिटलरच, म्हणून एकदाचा संपविला! संशयिताचा जबाब, औरंगाबादच्या डॉ. शिंदे खून प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार