Ichalkaranji Jayanti | भारतीय संविधान देशासाठी अभिमानास्पद; इचलकरंजीत मनसेच्यावतीने आंबेडकर जयंती

बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी, बाबासाहेबांनी जी घटना दिली आहे, ती घटना देशासाठी अभिमानस्पद असल्याचे सांगितले. बाबासाहेबांनी घटना लिहिल्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा हक्क मिळालेला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Ichalkaranji Jayanti | भारतीय संविधान देशासाठी अभिमानास्पद; इचलकरंजीत मनसेच्यावतीने आंबेडकर जयंती
इचलकरंजी शहरात मनसेतर्फे मोठ्या उत्साहात बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 3:52 PM

इचलकरंजीः इचलकरंजी शहरांमध्ये मनसेच्यावतीने जय भीम नगर झोपडपट्टीमध्ये आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजी शहरासह (Ichalkaranji) राज्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून कोणतेही उत्सव जयंती साजरी करण्यात आली नव्हती. कोरोना महामारीमुळे (Corona) संपूर्ण देश, राज्य लॉकडाऊनमध्ये होता. यंदा कोरोनाच्या निर्बंध उठवल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शहरातील जय भीमनगरमध्ये मनसेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मनसेचे प्रताप पाटील, शहाजी भोसले, मोहन मालवणकर, रवी गोंदकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

बाबासाहेबांचे विचार पोहचवा

या कार्यक्रमानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी, बाबासाहेबांनी जी घटना दिली आहे, ती घटना देशासाठी अभिमानस्पद असल्याचे सांगितले. बाबासाहेबांनी घटना लिहिल्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा हक्क मिळालेला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सर्वसामान्यांचा विचार करुन त्यांना त्यांच्या अधिकाऱ्याची जाणीव निर्माण करुन दिली म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मनसेच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी केली गेली आहे असं मत व्यक्त करण्यात आले.

बाबासाहेब आंबडेकर जयंती गेल्या दोनवर्षापासून मोठ्या उत्साहात साजरी झाली नव्हती. त्यामुळे यंदा कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर इचलकरंजी शहरासह परिसरातीन अनेक गावांमधून आंबेडकर जयंतीचे आयोजन केले गेले होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला मनसेचे पदाधिकारी महेश शेंडे, योगेश दाभोळकर, विशाल पाचापुरे, रामा बागल, संग्राम कोरे, राजेंद्र निकम आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

James lane Controversy: पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी, मनसेच्या मागणीनं वाद पेटला, पुरंदरेंनी ऑक्सफर्ड प्रेसला लिहिलेलं निषेध पत्रही सादर

Ambedkar Jayanti 2022: ‘स्‍टॅच्यू ऑफ नॉलेज’ने वाढविली लातूरची Image, अनोख्या उपक्रमाची राज्यभर चर्चा

Muktibhoomi Yeola | मुक्तीभूमी येवल्यात 15 कोटींची कामे होणार; बाबासाहेबांच्या जयंतीदिनी फुटला नारळ