AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार कोण ? एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक, मोठी खलबते

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेची आमदारकी देण्यासंदर्भात बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री बैठक होणार असल्याचे म्हटले जात आहे.

विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार कोण ? एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक, मोठी खलबते
bacchu kadu eknath shinde
| Updated on: Apr 28, 2026 | 9:06 PM
Share

राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी येत्या ३० एप्रिल रोजी अंतिम नावांची घोषणा होणार आहे. राज्यातील ९ विधानसभेच्या जागांपैकी ६ जागा भाजपाच्या वाटल्याला आल्या आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने माजी उपसभापती नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) आणि बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांच्या नावावर चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात या संदर्भात आज रात्री बैठक होणार असून त्यात अंतिम मोहर उमटवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी विधान परिषदेवर आमदार म्हणून जाण्यासाठी शिवसेनेची मनधरणी केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष ( Prahar Janshakti Party ) शिवसेनेतून विलीन करावा यावरच त्यांना आमदारकी द्यावी अशी मागणी शिवसेनेतून होत आहे.मात्र, केवळ विधान परिषदेतील आमदारकीसाठी बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिवसेनेत विलीन करु नये अशी भूमिका कडू यांच्या पक्षातील कार्यकर्ते करत आहेत. आज रात्रीत एकनाथ शिंदे यांच्या सोबत बच्चू कडू यांची या संदर्भात चर्चा होणार असून अंतिम निर्णय होणार असल्याचे म्हटले जात आहे.

कोणाला संधी मिळणार

विधान परिषदेचे ९ आमदार निवृत्त होत असून त्यांच्या रिक्त झालेल्या जागी येत्या १२ मे रोजी निवडणूक होत आहे. विधान परिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला २८ मतांचा कोटा गरजेचा आहे. शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ ५७ असून विधान परिषदेची दुसरी जागा निवडून येण्यास कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले जात आहे. विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे, बच्चू कडू आणि शीतल म्हात्रे यांच्या पैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?