Bajrang Sonwane Speech : बीडमध्ये मोठा गोंधळ‌! बजरंग सोनवणेंच्या भाषणाआधी तरुणाने अचानक माईक हिसकवला अन्…नेमकं काय घडलं?

बीडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान गोंधळ झाला. बजरंग सोनवणे हे भाषणाला उभे राहिले. त्यानंतर एका तरुणाने त्यांच्या हातातून धाडकन माईक हिसकावून घेतला.

Bajrang Sonwane Speech : बीडमध्ये मोठा गोंधळ‌! बजरंग सोनवणेंच्या भाषणाआधी तरुणाने अचानक माईक हिसकवला अन्...नेमकं काय घडलं?
Bajarange sonawane
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 14, 2026 | 7:54 AM

जायकवाडी प्रकल्पातून गेवराई तालुक्यातील 20 गावांसाठी स्वतंत्र कालवा निर्माण करावा, या मागणीसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत तरुणाने खासदर बजरंग सोनवणे यांच्या हातातील माईक खेचल्याची घटना घडली. त्याने माईक हातात घेऊन पाण्यासाठी पुढाकार घ्या, अशी मागणी केली. शिंगरवाडी येथील मंदिर परिसरात लोकलढा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला बीडचे खासदार बजरंग सोनवणे देखील उपस्थित होते.

बजरंग सोनवणे यांचे भाषण सुरू होण्याआधीच गावातील मनीष शेळके नावाच्या एका तरुणाने हातात माईक घेतला. त्यानंतर या तरुणाने म्हटलं की, बीडमध्ये रेल्वे आणण्याचे श्रेय अनेकजण घेतता. आता तुम्ही पाण्यासाठी लढा उभारा, आम्ही खरोखरच लोकांना सांगू की , खासदार बाप्पांनी पाणी आणून दिलं. या प्रश्नांसाठी शंभर वेळा फोन लावला, तुम्ही इथेल आलात, तर आमचा प्रश्न सोडवा, अशी मागणी तरुणाने केली. या तरुणाने विकास कामावरूनही जाब विचारला. बजरंग बप्पा आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे, पाण्यासाठी मी तुम्हाला शंभर फोन केले, आमच्या गावच्या रस्त्यांमध्ये गुडघ्या इतके खड्डे आहेत, आमचे प्रश्न आम्ही मांडायचे कुणापुढे? असा भर कार्यक्रमात सवाल उपस्थित केलाय. तर आमच्या गेवराईचे आमदार तर विसरूनच गेले आहेत, ते गेवराईचे आमदार आहेत की बीडचे असंही तरुणाने म्हटलं.

Loading...

रब्बी हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध होणार 

मराठवड्यातील अनेक भगात पावसाने पाठ फिरवली आहे. याच दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी हाती आली आहे. जायकवाडी प्रकल्पातून डावा आणि उजव्या कालव्यात पाण्याचे पहिलं आवर्तन सोडण्यात आलं. त्यामुळे हजारो हेक्टर वरील रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या काळात जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्याची आशा निर्माण झालीये. पावसाअभावी कोरड्या पडलेल्या नदी-नाल्यांसह पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागाला या आवर्तनामुळे मोठा आधार मिळणार आहे. आता जायकवाडीतून सोडण्यात आलेले पाणी आज परभणी जिल्ह्यात दाखल झालं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us