अजितदादांना गमावल्यानंतर बारामती विमानतळाचा कायापालट होणार, कामाला कधी सुरुवात होणार?
अजितदादांना गमावल्यानंतर बारामती विमानतळाचा कायापालट होणार आहे. आता या विमानतळाच्या कामाला कधी सुरुवात होणार, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बारामती विमानतळावर अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला. अजितदादांच्या निधनाला 10 महिने पूर्ण होत आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अघातानंतर बारामती विमानतळाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर बारामती विमानतळाच्या अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. त्यामुळे बारामती विमानतळावर उपाययोजना केल्या आहेत, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर बारामतीच्या विमानतळाचा कायापालट होणार आहे.
बारामती विमानतळासाठी निधी देखील मंजूर झालाय. बारामती विमानतळाचा कायापालट करण्यासाठी अखेर 132 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्य सचिवांच्या शक्ती प्रदत्त समितीने प्रस्ताव मांडला होता. बारामतीमधील हे विमानतळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातानंतर देशभरात चर्चेत आले होते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे विमानातळ दिले होते. विमानतळाच्या ऑपरेशन विकास व पायाभूत सुविधांसाठी 64 कोटी मंजूर करण्यात आला आहे. तर विमानतळ चालवण्यासाठी 68 कोटींची मंजुरी मिळाली आहे. विमानतळाच्या धावपट्टीसह सुरक्षा विभागाच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच फायर क्रॅश फोमसहित सुरक्षा भिंतही उभारली जाणार आहे. गेल्या वर्षी 30 डिसेंबरला विमानतळ एमआयडीसी कडून हस्तांतरित करण्यात आले होते. आता या बारामती विमानतळाच्या कामाला कधीपासून सुरुवात होणार, याची अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
1996 साली बांधले बारामती विमातळावर
दरम्यान, बारामती विमानतळ हे प्रादेशिक विमानतळ आहे. बारामती शहरापासून सुमारे 12 किमी अंतरावर आहे. या विमानतळावर खासगी उड्डाणे आणि वैमानिक प्रशिक्षणासाठी वापरले जाते. बारामतीमधील विमानतळ हे 1996 साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बांधले. या विमातळावरून सामान्य विमान वाहतूक आणि पायलट प्रशिक्षण सेवा उपलब्ध होते. या विमानतळाची धावपट्टी ही 5,500 x 100 फूट लांबी-रुंद आहे. बारामतीत 28 जानेवारी 2026 रोजी विमानतळाजवळील भागात झालेल्या अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. मुंबईहून बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न पायलटचा होता. VSR कंपनीच्या Learjet 45 विमानाचा हा अपघात झाला. अजितदादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण सर्वांनाच एकच मोठा धक्का बसला.