AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushmita Sen: ब्रेकअपनंतरही ललित मोदीचं सुष्मिता सेनवर प्रेम कायम? वाढदिवशी पोस्ट लिहित म्हणाला..

ललित मोदीच्या वाढदिवसाच्या पोस्टमुळे जुन्या नात्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. ब्रेकअपनंतरही एखाद्या व्यक्तीशी मैत्री आणि आदराचं नातं कायम राहू शकतं, याचीच चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.

Sushmita Sen: ब्रेकअपनंतरही ललित मोदीचं सुष्मिता सेनवर प्रेम कायम? वाढदिवशी पोस्ट लिहित म्हणाला..
ललित मोदी, सुष्मिता सेनImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 20, 2026 | 10:16 AM
Share

Sushmita Sen Birthday: अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हिने 19 नोव्हेंबर रोजी तिचा 51 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, यावेळी सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती ललित मोदीच्या पोस्टने. सुष्मितासोबत ब्रेकअप झाल्यानंतरही ललित मोदीने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ‘माझी प्रिय मैत्रीण सुष्मिता सेनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच हसत राहा’, अशा आशयाचा संदेश त्याने दिला आहे. त्याच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे.

ललित मोदीच्या खास पोस्टची चर्चा

ललित मोदीने सोशल मीडियावर सुष्मिता सेनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिला ‘डिअर फ्रेंड’ म्हणजेच प्रिय मैत्रीण असं म्हटलं आहे. ‘हॅपी बर्थडे टू माय डिअर फ्रेंड सुष्मिता सेन. कीप स्माइलिंग’, असा संदेश त्याने लिहिला. दोघांचं नातं आता संपुष्टात आलं असलं, तरी एकमेकांविषयीचा आदर आणि मैत्री कायम असल्याचं त्याच्या या पोस्टमधून दिसत आहे. त्यामुळे ललित मोदीच्या या शुभेच्छा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

पहा पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

2022 मध्ये नात्याची केली होती घोषणा

जुलै 2022 मध्ये ललित मोदीने सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंसोबत त्याने सुष्मिताला आपली ‘बेटर हाफ’ म्हटलं होतं. या पोस्टनंतर दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यांच्या लग्नाच्या चर्चांनाही सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर ललित मोदीने दोघांनी लग्न केलेलं नसून ते एकमेकांना डेट करत असल्याचं स्पष्ट केलं होतं. दोघांच्या नात्याची घोषणा झाल्यानंतर सुष्मिताला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. काही नेटकऱ्यांनी तिच्यावर ‘गोल्ड डिगर’ असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी सुष्मितानेही सोशल मीडियावर पोस्ट करत अशा टीकेला उत्तर दिलं होतं.

2025 मध्ये ब्रेकअपवर शिक्कामोर्तब

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. फेब्रुवारी 2025 मध्ये ललित मोदीने ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर जून 2026 मध्ये ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने दोघांच्या नात्याबद्दल मनमोकळेपणानं भाष्य केलं होतं. सुष्मिताचं करिअर भारतात होतं, तर आपण लंडनमध्ये राहत होतो. दोघांमधील भौगोलिक अंतर वाढत गेल्याने नातं टिकवणं कठीण झालं, असं त्याने सांगितलं होतं. मात्र, सुष्मिता आजही आपली खास मैत्रीण असल्याचं ललित यांनी म्हटलं होतं. ती एक उत्तम महिला असून तिने एकटीने आपल्या दोन्ही मुलींचा सांभाळ ज्या पद्धतीने केला आहे, ते कौतुकास्पद असल्याचंही त्याने सांगितलं. याशिवाय सुष्मिताला गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांनाही त्याने उत्तर दिलं होतं. ती स्वतःच्या मेहनतीने यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं.

Follow Us
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद, थेट न्यायालयात..
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद कायम, थेट न्यायालयात याचिका दाखल
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात...
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी...
PUC : केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी नवे नियम जारी...
तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना...
PM Modi : तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना थेट सवाल
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र...
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी