AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अनाथाश्रमात भेटलेल्या या चिमुकलीने..’; सुष्मिता सेनच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

अभिनेत्री सुष्मिता सेनने 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकून 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त तिने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ती एका चिमुकलीसोबत असून तिला सुष्मिताने अनाथाश्रमातून दत्तक घेतलं होतं.

'अनाथाश्रमात भेटलेल्या या चिमुकलीने..'; सुष्मिता सेनच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
Sushmita SenImage Credit source: Instagram
| Updated on: May 21, 2024 | 1:46 PM
Share

तीस वर्षांपूर्वी 21 मे 1994 रोजी अभिनेत्री सुष्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकत भारतीयांची मान उंचावली होती. त्या घटनेला आज तीस वर्षे पूर्ण झाल्याने सुष्मिताने आठवणींना उजाळा दिला आहे. तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. इन्स्टाग्रामवर तिने एका चिमुकलीसोबतचा फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. सुष्मिताच्या कडेवर असलेली ही चिमुकली तिचीच मुलगी रेने आहे. रेनेला सुष्मिताने अनाथाश्रमातून दत्तक घेतलं होतं. तिनेच मला माझ्या आयुष्यातील अत्यंत निरागस आणि तितकीच खोल शिकवण दिल्याचं सुष्मिताने या पोस्टमध्ये म्हटलंय.

सुष्मिता सेनची पोस्ट-

‘अनाथाश्रमात भेटलेल्या या चिमुकल्या मुलीने मी 18 वर्षांची असताना आयुष्यातील सर्वांत निरागस आणि तितकीच महत्त्वपूर्ण शिकवण दिली. आजही मी त्याला अनुसरून जगतेय. कॅमेराच टिपलेला हा क्षण 30 वर्षांपूर्वीचा आहे, जेव्हा भारताने ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला होता. तेव्हापासूनचा हा प्रवास अत्यंत अद्भुत राहिला आहे’, असं लिहित तिने चाहत्यांचे आभार मानले.

सुष्मिताने आधी ‘मिस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला होता. नंतर 1994 मध्ये तिची स्पर्ध ऐश्वर्या रायविरुद्ध होती. यात तिने विजेतेपद पटकावलं होतं. एका मुलाखतीत सुष्मिताने सांगितलं होतं की, स्पर्धेतील ऐश्वर्याच्या सहभागाबद्दल कळताच तिने तिचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आईने तिने समजावलं होतं. “माझी आई म्हणाली की ठीक आहे, तिला जिंकू दे. जर तुला वाटत असेल की ती जगातील सर्वांत सुंदर महिला आहे, तर तिला तुझा पराभव करू दे. इतरांकडून हरण्यात काय अर्थ आहे? तू पूर्ण प्रयत्न कर”, असं सुष्मिताने सांगितलं होतं.

मुलीला दत्तक घेण्याच्या निर्णयाबाबत आजही सुष्मिता सेनचं खूप कौतुक केलं जातं. असा निर्णय घेताना अनेकजण पुनर्विचार करतात. मात्र सुष्मिता त्याबाबत ठाम होती आणि या निर्णयात तिला तिच्या वडिलांनी पाठिंबा दिला होता. एका मुलाखतीत सुष्मिता तिच्या दत्तक घेतलेल्या मुलीच्या खऱ्या आईवडिलांविषयी व्यक्त झाली होती. रेने असं तिच्या या मुलीचं नाव आहे. रेनेच्या 18 व्या वाढदिवसापूर्वी सुष्मिताने तिला तिच्या खऱ्या आईवडिलांबद्दल जाणून घेण्याच्या हक्काविषयीची माहिती दिली होती. इतकंच नव्हे तर तिची इच्छा असल्यास त्यांचा शोध घेण्याचीही तयारी सुष्मिताने दाखवली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...