AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांना गमावल्यानंतर बारामती विमानतळाचा कायापालट होणार, कामाला कधी सुरुवात होणार?

अजितदादांना गमावल्यानंतर बारामती विमानतळाचा कायापालट होणार आहे. आता या विमानतळाच्या कामाला कधी सुरुवात होणार, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अजितदादांना गमावल्यानंतर बारामती विमानतळाचा कायापालट होणार, कामाला कधी सुरुवात होणार?
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 10:28 AM
Share

बारामती विमानतळावर अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला. अजितदादांच्या निधनाला 10 महिने पूर्ण होत आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अघातानंतर बारामती विमानतळाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर बारामती विमानतळाच्या अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. त्यामुळे बारामती विमानतळावर उपाययोजना केल्या आहेत, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर बारामतीच्या विमानतळाचा कायापालट होणार आहे.

बारामती विमानतळासाठी निधी देखील मंजूर झालाय. बारामती विमानतळाचा कायापालट करण्यासाठी अखेर 132 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्य सचिवांच्या शक्ती प्रदत्त समितीने प्रस्ताव मांडला होता. बारामतीमधील हे विमानतळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातानंतर देशभरात चर्चेत आले होते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे विमानातळ दिले होते.  विमानतळाच्या ऑपरेशन विकास व पायाभूत सुविधांसाठी 64 कोटी मंजूर करण्यात आला आहे. तर विमानतळ चालवण्यासाठी 68 कोटींची मंजुरी मिळाली आहे.  विमानतळाच्या धावपट्टीसह सुरक्षा विभागाच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच फायर क्रॅश फोमसहित सुरक्षा भिंतही उभारली जाणार आहे.  गेल्या वर्षी 30 डिसेंबरला विमानतळ एमआयडीसी कडून हस्तांतरित करण्यात आले होते. आता या बारामती विमानतळाच्या कामाला कधीपासून सुरुवात होणार, याची अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

दरम्यान, बारामती विमानतळ हे प्रादेशिक विमानतळ आहे. बारामती शहरापासून सुमारे 12 किमी अंतरावर आहे.  या विमानतळावर खासगी उड्डाणे आणि वैमानिक प्रशिक्षणासाठी वापरले जाते. बारामतीमधील विमानतळ हे १९९६ साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बांधले. या विमातळावरून  सामान्य विमान वाहतूक आणि पायलट प्रशिक्षण सेवा उपलब्ध होते. या विमानतळाची धावपट्टी ही 5,500 x 100 फूट लांबी-रुंद आहे.

Follow Us
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद, थेट न्यायालयात..
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद कायम, थेट न्यायालयात याचिका दाखल
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात...
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी...
PUC : केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी नवे नियम जारी...
तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना...
PM Modi : तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना थेट सवाल
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र...
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी