Loksabha Election | बारामतीमधील घराणेशाहीविरोधात लढणार म्हणणाऱ्या शिवतारेंबाबत शरद पवार म्हणाले…

| Updated on: Mar 13, 2024 | 4:45 PM

बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा तिरंगी लढत होणार असल्याचं दिसत आहे. यामध्ये महायुतीमधील शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी आपण अपक्ष लढणार असल्याचं सांगितलं आहे. बारामतीलधील घराणेशाहीविरोधात लढणार म्हणणाऱ्या शिवतारेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Loksabha Election | बारामतीमधील घराणेशाहीविरोधात लढणार म्हणणाऱ्या शिवतारेंबाबत शरद पवार म्हणाले...
Follow us on

नाशिक : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नणंद आणि भावजय एकमेकींविरोधात येणार असताना महायुतीमधील शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनीही दंड थोपटले आहेत. विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणुक लढवणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. महायुतीमधील बारामती लोकसभेची जागा अजित पवार गटाला देण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून त्यांच्याच पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात येणार आहेत. दोन्ही पवांरांना पराभूत करणार असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्य आणि केंद्र सरकावर निशाणा साधला. ईडी कारवाई आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारला घेरलं.  2014 नंतर 121 लोकांची चौकशी केली त्यात 115 हे विरोधी पक्षाचे आहेत. ईडी ही विरोधी पक्षासाठी आहे. आमच्या काळात राजकीय हेतूने ईडीची कारवाई केली नाही. पीएम मोदींच्या काळात ईडीचा गैरवापर करण्यात आल्याची टीका शरद पवारांनी केली.

बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावर बोलताना, विजय शिवतारे यांनी आता निर्णय घेतला आहे. शिवतारे यांचे कार्यकर्ते आणि मतदार हा महाविकास आघाडीचा नाही. आता याचा फायदा कोणाला होईल हे पाहूया. शिवतारे शेवटपर्यंत लढणार आहेत का हेसुद्धा पाहुया, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

बारामतीची जागा मी लढणारच- विजय शिवतारे

पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र थांबायला हवं. फडणवीसांच्या भाषेत हे कालचक्र असून बारामतीची निवडणुक कालचक्राचाच भाग आहे. अजित पवार उर्मट, त्यांचा उर्मटपणा अजून गेला नाही. बारामतीलमधील घराणेशाहीविरोधात लढणार, प्रस्थापितांविरोधात दंड थोपटलं पाहिजे. गावागावातील लोक म्हणतात अजित पवार जिंकणार नाहीत असं शिवतारे म्हणाले.

शिवतारेंच्या मनात राग, ते भूमिका बदलतील- गिरीश महाजन

शिवतारे माझे मित्र आणि जुने सहकारी आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मी त्यांना फोनवर संपर्क साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना ते भेटणार आहेत. त्यांच्या मनामध्ये राग आहे मात्र आमचे नेते त्यांची समजूत काढतील. शेवटी आम्ही वेगवेगळे लढलेलो आहोत. एकमेंकांनी पाडलेलं पण आता सगळे एकत्र झाले आहेत. त्यामुळे समजून घ्यावं लागणार आहे. नेते समजूत काढतील आणि या विषयावर तोडगा निघेल, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.