AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut :  गृहमंत्री डोळे बंद… नाशिकच्या भोंदूबाबावरून संजय राऊतांचा थेट निशाणा, कुणाच्या राजीनाम्याची केली मागणी

Sanjay Raut on Rupali Chakankar: नाशिकच्या भोंदूबाबाचे प्रकरण समोर आल्यापासून राज्यात एकच धुमाकूळ सुरू आहे. या भोंदूबाबाचे राजकीय कनेक्शन उघड झाल्यानंतर तर अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यात खासदार संजय राऊत यांनी तर या सर्व प्रकारावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

Sanjay Raut :  गृहमंत्री डोळे बंद... नाशिकच्या भोंदूबाबावरून संजय राऊतांचा थेट निशाणा, कुणाच्या राजीनाम्याची केली मागणी
संजय राऊतांचा निशाणाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 19, 2026 | 11:37 AM
Share

Sanjay Raut on Rupali Chakankar: नाशिकच्या भोंदूबाबाच्या प्रकरणाने बुवाबाजी आणि त्याआड होत असलेल्या शोषणाच्या काळीज पिळवटणाऱ्या कथा समोर येत आहे. तर या भोंदूबाबाचे राजकीय कनेक्शन उघड झाल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सर्व प्रकारावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. चाकणकर या भोंदूबाबाचे पाद्यपूजन करत असल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर राऊतांनी त्यांच्यावर टीका केली. चाकणकर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली.

त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहूच नये

रुपाली चाकणकर या मूर्ख आहेत. त्या खोटं बोलत आहेत. त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहूच नये. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी पद सोडले पाहिजे. या प्रकरणात वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतोच कुठे अशी चपराक त्यांनी लगावली. एका महिलेने हा सर्व प्रकार सहन न झाल्याने तक्रार दिली. तर चाकणकर यांनी तक्रार दाखल न करण्यासाठी अनेकांदावर दबाव आणला असा आरोप राऊतांनी केला.

त्यांना का वाचवलं जातंय?

रुपाली चाकणकर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्या वादग्रस्त आहेत. त्यांना कोण आणि का वाचवतंय हा प्रश्न मला पडला आहे. त्या नाशिकच्या भोंदूबाबाने अनेक महिलांवर अत्याचार केले. त्या मराठी महिला आहेत. तर महिला आयोगाच्या अध्यक्ष या भोंदूबाबाचे पाद्यपूजन करतात आणि गृहमंत्री डोळे बंद करत बसले आहेत, अशी टीका राऊतांनी केली. रुपाली चाकणकर यांनी नैतिकतेच्या आधारावर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करा

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर आहे. तर शासनातील मोठ्या पदावरील व्यक्त मग त्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा असू देत अथवा मंत्री, आमदार हे सगळे अंधश्रद्धेने त्या बाबाची पूजा करतात. कोणी जादूटोण्याला तिथं बसलं आहे. त्यांच्यासोबत ज्यांची ज्यांची छायाचित्र आले आहेत. त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली. ढोंग आणि अंधश्रेद्धविरोधात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. सत्तेत टिकण्यासाठी मंत्रीच असे करणार असतील तर गृहमंत्रालयाने त्यांना बडतर्फ करायला हवे अशी मागणीही राऊतांनी केली.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी