मार्चच्या रणरणत्या उन्हात राजकीय वातावरण तापणार, सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा बिगूल वाजला

| Updated on: Feb 17, 2023 | 7:02 PM

ग्रामीण भागात सहकाराचे मोठे जाळे आहे. त्यामध्ये गावपातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पद देणं, निवडून आणण्यासाठी अनेक पक्ष प्रयत्न करीत असतात. त्यासाठी या निवडणुका महत्वाच्या मानल्या जातात.

मार्चच्या रणरणत्या उन्हात राजकीय वातावरण तापणार, सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा बिगूल वाजला
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका ( Election ) रखडल्या होत्या. सुरुवातीला कोरोनामुळे या निवडणुका रखडल्या होत्या. त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेल्याने या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. त्यानंतर आता याबाबतचा मुद्दा न्यायालयाच्या आदेशानंतर मोकळा झाल्यानंतर राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने ( election Cooperative Societies )याबाबत आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतची तयारी सुरू केली आहे.

राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने गाव पातळीवर असेलेल्या संस्थांमध्ये प्रशासक नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात समधनाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागात सहकाराचे मोठे जाळे आहे. त्यामध्ये गावपातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पद देणं, निवडून आणण्यासाठी अनेक पक्ष प्रयत्न करीत असतात. त्यासाठी या निवडणुका महत्वाच्या मानल्या जातात.

हे सुद्धा वाचा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता मार्च महिन्यात होणार आहे. खरंतर याच काळात रणरणत्या उन्हात ही रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. 1 एप्रिल ते 2021 ते 31 डिसेंबर 2022 च्या काळातील मुदत संपलेल्या संस्थांचा यामध्ये समावेश असणार आहे.

प्राधिकरणाने 15 फेब्रुवारीच्या आदेशानुसार निवडणुकीस पात्र असलेल्या संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू करण्याचे आदेशीत केले आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे.

राज्यातील एकूण 20 हजार 638 संस्था या निवडणूक प्रक्रियेत असणार आहे. त्यानुसार अ, ब, क. ड असे वर्ग करण्यात आले आहे. सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ही मुदत संपण्यापूर्वी अनुक्रमे सुरू करण्याचे आदेश दिले आहे.

ग्रामीण भागात या निवडणुकीला मोठं महत्व असतं. ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी या निवडणुकीची वाट अनेक दिवसांपासून पाहत होते. त्यामुळे आता या निवडणुका जाहीर झाल्यानंतर समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संस्थांमध्ये 28 सहकारी साखर कारखाने, तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 16 सहकारी सूतगिरण्यांचा समावेश आहे. त्यामुळे साखर कारखाने आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजल्याने सर्वच राजकीय कामाला लागले आहे.

ऐन निवडणुकीच्या दरम्यान रणरणते ऊन असणार आहे. त्यातच राजकीय वातावरण देखील तापणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आगामी काळात राजकीय वातावरण तापणार हे निश्चित झाले आहे. त्यात आता राजकीय पक्ष काय तयारी करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

याशिवाय येत्या काळात प्राधिकरण निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.