बीडच्या माजी उपसरपंचाचा भाचा पुढे, थेट गंभीर आरोप, म्हणाला, मामाला राजकीय लोकांनीच नर्तकीसोबत…

Beed Crime Govind Barge Case : लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या हत्येनंतर सातत्याने धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आता गोविंद बर्गे यांचा भाचा थेट पुढे आला असून त्याने मागील सहा महिन्यात नेमके काय घडले हेच थेट सांगून टाकले आहे.

बीडच्या माजी उपसरपंचाचा भाचा पुढे, थेट गंभीर आरोप, म्हणाला, मामाला राजकीय लोकांनीच नर्तकीसोबत...
Govind Barge case
| Updated on: Sep 11, 2025 | 1:16 PM

सोलापुरातील सासुरे गावात बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली. कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या घराच्यासमोर आपल्या चारचाकी गाडीत बसून त्यांनी स्वत:वर गोळी झाली. यानंतर एकच खळबळ उडाली. आता गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर गोविंद बर्गे यांच्या भाच्याने थेट धक्कादायक आरोप केली आहेत. गोविंद बर्गे यांचा भाचा एका वृत्तवाहिनीला बोलत असताना त्याने मागील सहा महिन्यात काय काय घडले आणि आपल्या मामाला नेमके कसे फसवण्यात आले हे सांगितले. पोलिसांनी नर्तकी पूजा गायकवाड हिला अटक केली असून सध्या तिची रवानगी कोठडीत करण्यात आलीये.

गोविंद बर्गे यांचा भाच्याने म्हटले की, माझा मामा हा निर्व्यसनी होता आणि त्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते. माझ्या मामाकडे कधी बंदूक नव्हती. हा काहीतरी मोठा कट असून माझ्या मामाला फसवण्यात आले. मुळात म्हणजे मामा हा मागील सहा महिन्यांपासून प्रचंड तणावात होता. माझ्या मामाची आणि पूजा गायकवाडची ओळख राजकीय लोकांनीच करून दिली होती. चित्र वेगळी दाखवले जात आहे.

सध्या आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्याने म्हटले. पुढे बोलताना गोविंद बर्गे यांचा भाचा म्हणाला की, माझा मामा हा निर्व्यसनी होता. त्याच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्या. आता गोविंद बर्गे यांच्या भाच्याने केलेल्या या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांकडून असेही सांगितले जात आहे की, ही आत्महत्या नसून ही हत्याच आहे. गोविंद कधी काठीहीसोबत ठेवत नव्हता. मग बंदूक कशी आली, हा देखील प्रश्न कुटुंबियांनी उपस्थित केला.

गोविंद बर्गे प्रकरणात कला केंद्रातील नर्तकीवर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय. मागील दीड वर्षांपासून गोविंद आणि पूजा संपर्कात होते. यादरम्यानच्या काळात गोविंद याने पूजाला महागड्या वस्तू दिल्या होत्या. मात्र, पूजाला गेवराईतील बंगला आपल्या नावे करून हवा होता, असाही आरोप केला जात आहे.