
परळीतील तहसील कार्यालयासमोर 20 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने परळी शहरासह बीड जिल्हात खळबळ उडाली. मात्र, 2023 ते आतापर्यंत या प्रकरणात एकही आरोपी अटक करण्यात आला नाहीये. महादेव मुंडे यांच्या हत्येला तब्बल 21 महिने लोटून गेली. महादेव मुंडे यांच्यापत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रोहित पवार हे देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीला गेले होते.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात एकूण 5 संशयित लोकांची चौकशी सुरू
या 21 महिन्यात आठ तपास अधिकारी बदलले गेले. मात्र, तपास हा काही पुढे सरकला नाही. आता महादेव मुंडे प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट ही पुढे येताना दिसतंय. महादेव मुंडे हत्या प्रकरणात एकूण 5 संशयित लोकांची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती मिळतंय. 10 ते 12 जणांकडे तपास करण्यात आला आहे. एका गोपनीय साक्षीदाराकडेही तपास करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतली होती काल मुख्यमंत्र्यांची भेट
संशयित आरोपी गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळतंय. अजून तरी कोणाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत नाहीये. मात्र, लवकरच मोठी अपडेट पुढे येऊ शकते. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत थेट आरोपींची नावे सांगितल्याची माहिती मिळत आहे. मागील काही महिन्यापासून ज्ञानेश्वरी मुंडे या पतीला न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आरोपी गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी पोलिस मुंबईकडे रवाना
पोलिस या प्रकरणात व्यवस्थित तपास करत नसल्याचे सांगत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी थेट विष घेतले होते. ज्यानंतर खळबळ उडाली. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणी तपासाला वेग आल्याचेही बघायला मिळत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा हा तूफान चर्चेत आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एस आरोपी हा अजूनही फरार आहे. त्याचा शोध मागील काही दिवसांपासून घेतला जात आहे.