AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंगल्यावरून फोन जायचे अन्…, महादेव मुंडे हत्याप्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या पतीच्या हत्येसंदर्भात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

बंगल्यावरून फोन जायचे अन्..., महादेव मुंडे हत्याप्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 31, 2025 | 5:21 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली होती, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केलं आहे. वाल्मिक कराड हा देखील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अटक आहे. मात्र आता आणखी एका प्रकरणात वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात देखील वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वाल्मिक कराडचे जुने सहकारी असलेले बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडवर आरोप केले होते. वाल्मिक कराड यानेच महादेव मुंडे आणि त्यांच्या हत्येचा आयव्हिटनेस असलेल्या व्यक्तीला संपवलं असा आरोप बाळा बांगर यांनी केला होता. एवढंच नाही तर मला देखील जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, असा दावा देखील बाळा बांगर यांनी केला आहे. दरम्यान बाळा बांगर यांच्या आरोपांनंतर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हणाल्या ज्ञानेश्वरी मुंडे? 

ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. न्याय मिळायला हवा यासाठी मी सर्व नेत्यांची भेट घेणार आहे,  मुख्यमंत्री यांच्यावर पुर्ण विश्वास आहे, पण मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन जायचे, त्यामुळे वाल्मिक कराडच्या भितीपोटी पोलिसांनी तपास थांबवला असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, धनुभाऊंनी खरं तर भूमिका घ्यायला हवी होती, पण त्यांनी ती घेतली नाही, मला याची खंत आहे.

दरम्यान महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.  जरांगे पाटील यांनी आत्ता ऊद्या बैठक ठेवलीये, त्यांचे आभार व्यक्त करते आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था