
प्रतिनिधी अक्षय मंकनीसह संभाजी मुंडे, टीव्ही ९ मराठी : बीड जिल्ह्या गेल्या एक महिन्यापासून माध्यमांच्याच नाही तर पोलीस, सीआयडी, विशेष पथकांच्या रडारवर आला आहे. खंडणी पॅटर्न, बोगस पीक विमा पॅटर्न असो की हत्येचा पॅटर्न बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी वार्ता मराठवाड्याला नवीन नाहीत. पण राज्याला त्याची आता नव्याने ओळख होत आहे. परळीतील राजकीय गुन्हेगारी आणि खूनांची मालिका जुनीच आहे. आता ती नव्याने पुन्हा चर्चेत आली आहे. काय आहे या टेरर कथा? हे तर क्राईट सिंडीकेट आजवर परळीत पडलेल्या खूनांचे पट जर उलगडले तर एखाद्या क्राईम सिंडिकेटची वेबसीरिजही फिकी पडेल. इतक्या...