पाडळसिंगी टोल नाक्यावरील रास्ता रोको आंदोलन साडेतीन तासानंतर स्थगित

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत सरकार आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधण्यात आले. मात्र, प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे.

पाडळसिंगी टोल नाक्यावरील रास्ता रोको आंदोलन साडेतीन तासानंतर स्थगित
Road
Image Credit source: Representative Image
| Updated on: Nov 21, 2026 | 4:55 PM

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी टोल नाक्यावरील रास्ता रोको आंदोलन साडेतीन तासानंतर स्थगित करण्यात आलं. ऊस दरासाठी 26 नोव्हेंबरला निर्णायक बैठक आहे. प्रश्न न सुटल्यास 27 तारखेला पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तब्बल साडेतीन तास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला होता. लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. ऊसाला 4200 रूपये भाव मिळावा, या मागणीसाठी बीडच्या पाडळसिंगी टोलनाक्याजवळ शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत सरकार आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधण्यात आले. मात्र, प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. 26 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात साखर कारखानदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Loading...

शेतकऱ्यांनी काय इशारा दिला?

या बैठकीत ऊसाचा दर निश्चित होण्याची शक्यता आहे. गेवराईच्या तहसीलदार गीतांजली गरड यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली. मात्र, 26 तारखेपर्यंत प्रश्न मार्गी न लागल्यास 27 नोव्हेंबरला पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बीडमध्ये शिक्षण विभागात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, तक्रारदाराची माहिती

राज्यात 2012 पासून शिक्षक भरती बंद असतानाही शिक्षकांची भरती करण्यात आली. न्यायालयांच्या सूचनांचा सोयीस्कर अर्थ लावून यांना नियुक्ती दिल्या गेल्या. काही ठिकाणी संच मान्यतेच्या दुरुस्तीच्या नावाखाली पदं वाढवण्यात आले तर इतर ठिकाणी बनावट विद्यार्थ्यांच्या आधारे संच मान्यतेचे पद वाढवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यासाठी अन्य बनावट कागदपत्रे वापरल्याची माहिती आहे. त्यावरुन, शिक्षण विभागाने 73 शिक्षकांची सेवा समाप्त केल्याची माहिती तक्रारदाराने दिली. याप्रकरणी आणखी 2217 बोगस पद निर्माण करुन भरती केलेल्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती याबाबत तक्रारीतून पाठपुरावा करणाऱ्या सादेक इनामदार यांनी दिली. शिक्षक भरती प्रकरणात बीड येथील सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी एसआयटीकडे तक्रार केली होती. त्यानंतर, ही कारवाई करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us