AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवतेची पूजा करता, पण घरच्या लक्ष्मीला…, अन् भुजबळ संतापले, नेमकं काय म्हणाले?

लक्ष्मी, सरस्वती आणि भवानी मातेची पूजा करणारा समाज घरातील महिलांना मात्र आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षण आणि निर्णयाचे अधिकार देताना मागे का राहतो? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

देवतेची पूजा करता, पण घरच्या लक्ष्मीला..., अन् भुजबळ संतापले, नेमकं काय म्हणाले?
Chhagan Bhujbal Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 4:42 PM
Share

लक्ष्मी, सरस्वती आणि भवानी मातेची पूजा करणारा समाज घरातील महिलांना मात्र आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षण आणि निर्णयाचे अधिकार देताना मागे का राहतो? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. महिलांना केवळ देवतेच्या भूमिकेत न ठेवता प्रत्येक क्षेत्रात समान संधी देण्याची गरज आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. लक्ष्मीला संपत्तीची देवता मानून तिची पूजा करायची, पण घरातील महिलेला आर्थिक अधिकार द्यायचे नाहीत. सरस्वतीची पूजा करायची, मात्र घरातील मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आला की लग्नाचं कारण पुढे करायचं,  असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ?  

लक्ष्मीला संपत्तीची देवता मानून तिची पूजा करायची, पण घरातील महिलेला आर्थिक अधिकार द्यायचे नाहीत. सरस्वतीची पूजा करायची, मात्र घरातील मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आला की लग्नाचं कारण पुढे करायचं. भवानी मातेचा जयघोष करायचा, पण प्रत्यक्षात महिलांना घरातच बसण्याचा सल्ला द्यायचा. समाजातील याच विरोधाभासावर मंत्री छगन भुजबळ यांनी बोट ठेवत संताप व्यक्त केला आहे.

महिलांना केवळ देवतेच्या भूमिकेत न ठेवता शिक्षण, नोकरी, प्रशासन, राजकारण आणि सैन्य अशा प्रत्येक क्षेत्रात समान संधी देण्याची गरज असल्याचं  त्यांनी म्हटलं आहे. ज्या देशांनी महिलांना बरोबरीने काम करण्याची संधी दिली, ते देश पुढे गेले. मात्र महिलांची ५० टक्के मानवी ताकद घरातच मर्यादित ठेवणारे देश मागे राहिले, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. राजीव गांधी, नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यासह विविध नेत्यांनी महिलांच्या शिक्षण आणि आरक्षणासाठी घेतलेल्या भूमिकांचाही त्यांनी  यावेळी उल्लेख केला आहे. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा दाखला देत महिलांना समान संधी द्यायला पाहिजे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे, ते जुन्नरमध्ये बोतल होते.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि भुजबळ यांच्यामध्ये बैठक देखील झाली आहे. या बैठकीबाबत बोलताना कोल्हे म्हणाले की,  राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाल्या नाहीत, ही वस्तुस्थिती मांडली. फुलेंच्या मालिकेसंदर्भात  भुजबळ साहेबांशी भेट झाली. त्यांनी मालिकेसाठी मोठं पाठबळ दिलं आहे. यापुढं ही भुजबळ साहेबांशी माझी भेट झाली तर ती मालिकेसाठी झाली असं समजा. जर गोपनीय चर्चा झाली असेल तर ती जाहीरपणे सांगायची असते का? असं कोल्हे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली