AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील प्रशासनात मोठा उलटफेर! तीन दिवसांत 7 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यातील प्रशासनात मोठा उलटफेर झाला आहे. मागील तीन दिवसांत सात बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. जाणून घ्या कोणाची कुठे नियुक्ती झाली.

राज्यातील प्रशासनात मोठा उलटफेर! तीन दिवसांत 7 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती?
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 4:31 PM
Share

राज्यातील प्रशासनात मोठा उलटफेर झाला आहे. राज्य सरकारने चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासनातील दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ आणि राज्यकर विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणयात आल्या आहेत. चारही अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. प्रशासनाच्या फेरबदलाची जोरदा चर्चा होत आहे.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केले. दोन दिवसांआधीच तीन आयएस अधिकऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. मागीत काही दिवसांत सात आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत मोठे फेरबदल सुरू असल्याचे दिसत आहे. चार अधिकाऱ्यांपैकी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनाही नवी जबाबदारी सोपवली आहे. तसेच तीन आयएएस अधिकाऱ्यांना देखील इतर विभागाची जबाबदारी दिली आहे.

कोणाची कुठे बदली?

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे (MAIDC) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेले अशोक काकडे यांची मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत असलेले प्रवीण कुंडलिक पुरी यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी गुलाब राजाराम खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून कार्यरत असलेल्या देशमुख यांची मुंबईतील राज्य कर विभागाच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांत आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात विविध महामंडळे आणि महात्वाच्या आयोगांमधील महत्वाच्या पदाचा समावेश आहे. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामकाजात नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. काल जाहीर करण्यात आलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार चार अधिकाऱ्यांच्या नवीन पदाची जबाबदारी देण्यात आली.

Follow Us
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली