AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FDA Raid Nashik: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा नाशिकमध्ये सर्जिकल स्ट्राईक! 5 प्रसिद्ध मिसळ हॉटेल्सवर कारवाई, तपासणीत काय काय आढळलं?

काही दिवसांपूर्वीच एफडीएने पुण्यातील सर्वात प्रसिद्ध हॉटेल वैशाली तसेच हॉटेल रुपालीवर कारवाई करत थेट परवाना रद्द केला होता. या कारवाईने पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते, अशातच आता एफडीएने नाशिकमध्ये सर्वात मोठी कारवाई केली आहे. 

FDA Raid Nashik: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा नाशिकमध्ये सर्जिकल स्ट्राईक! 5 प्रसिद्ध मिसळ हॉटेल्सवर कारवाई, तपासणीत काय काय आढळलं?
| Updated on: Nov 21, 2026 | 4:29 PM
Share

Maharashtra FDA Nashik Raid News:  तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर कारवाईचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वीच एफडीएने पुण्यातील सर्वात प्रसिद्ध हॉटेल वैशाली तसेच हॉटेल रुपालीवर कारवाई करत थेट परवाना रद्द केला होता. या कारवाईने पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते, अशातच आता एफडीएने नाशिकमध्ये सर्वात मोठी कारवाई केली आहे.

नाशिकमध्ये एफडीएची सर्वात मोठी कारवाई 5 हॉटेल्सला दणका! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने 5 नामांकित हॉटेलवर मोठी कारवाई केली आहे. कॉलेज रोडवरील दुर्गा कॅफेचे नोंदी प्रमाणपत्र एफडीएने निलंबित केले आहे. तसेच तुषार, शामसुंदर आणि विहार या 3 नामांकित मिसळ हॉटेलवरही छापे टाकलेत. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छतेच्या गंभीर तक्रारींनंतर एफडीएने ही कारवाई केली आहे.

एफडीएने नाशिकमधील जुना गंगापूर नाका, गंगापूर रोडवर असलेल्या प्रसिद्ध हॉटेल विहारवर कारवाई केली आहे.  हॉटेल विहारच्या तपासणीमध्ये अधिकाऱ्यांना अस्वच्छता आढळली तसेच अन्न सुरक्षा व मानक नियमांचे उल्लंघन, अन्न तयार करण्याच्या ठिकाणी किटक व इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव आढळला ज्यामुळे ही कारवाई केली. त्याचसोबत सातपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या हॉटेल शामसुंदरवरही कारवाई केली आहे. हॉटेल शामसुंदरमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या.

दुर्गा कॅफे, तुषार मिसळवरही कारवाईचा बडगा! 

त्यासोबतच एफडीएने कॉलेज रोडवर असलेल्या दुर्गा कॅफेलाही दणका दिला आहे. अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलांवर FSSAI परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळले. तसेच मेन्यू कार्ड किंवा डिस्प्ले एरियामध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमाचा (Cooking Medium) उल्लेख नसल्याचे निदर्शनास आले. शहरातील असवारी चौकासमोर असलेल्या तुषार मिसळलाही एफडीएने चांगलाच दणका दिला आहे.

तुषार मिसळमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी अपुरी जागा, मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले. त्याचबरोबर आडगाव फाटा येथे असलेल्या हॉटेल महाराजा काठियावाडीवरही एफडीएने कारवाई केली आहे. हॉटेल महाराजा काठियावाडीच्या आस्थापनेमध्ये अस्वच्छता आढळली, स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा आढळली, तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी धूळ व किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याचे आढळले, त्यानंतर एफडीएने कारवाई केली आहे.

Follow Us
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली