AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarfaraz Khan: जगाने ट्रोल केलं, कुटुंबाने अश्रू ढाळले; पण गौतम गंभीर पाठीशी उभे राहिले! सरफराजने सांगितला कठीण प्रसंग

How Gautam Gambhir Helped Sarfaraz Khan Through His Toughest Phase: 2024-25 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ड्रेसिंग रूममधील संभाषणे लीक केल्याचा आरोप सरफराज खानवर होता.

Sarfaraz Khan: जगाने ट्रोल केलं, कुटुंबाने अश्रू ढाळले; पण गौतम गंभीर पाठीशी उभे राहिले! सरफराजने सांगितला कठीण प्रसंग
Sarfaraz Khan Reveals How Gautam Gambhir Supported Him
| Updated on: Nov 21, 2026 | 4:31 PM
Share

सरफराज खान सध्या भारतीय संघाबाहेर आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांच्या ‘बैठ और बोल’ या शोमध्ये सरफराज खानने ड्रेसिंग रूममधील संभाषणे लीक केल्याचा आरोप झाल्यानंतरच्या आपल्या कठीण काळाबद्दल सांगितले. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सरफराज खानने खुलासा केला आहे की, त्याच्या कारकिर्दीतील एका कठीण काळात प्रशिक्षक गंभीर यांनी त्याला पाठिंबा दिला होता. 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान ड्रेसिंग रूममधील संभाषणे लीक केल्याचा आरोप सरफराजवर झाला होता.

त्यानंतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. ज्यामुळे त्याचे कुटुंब खूप दुःखी झाले. त्याची पत्नी रडत होती. सरफराजचे वडील आणि प्रशिक्षक यांनाही ही परिस्थिती कशी हाताळावी हे सुचत नव्हते. त्याच वेळी प्रशिक्षक गंभीरने त्याला फोन करून त्याचे सांत्वन केले. त्याला प्रोत्साहन दिले. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांच्याशी झालेल्या संभाषणात सरफराजने या संपूर्ण वादावर उघडपणे भाष्य केले.

सरफराज खानने स्पष्ट केले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतात परतल्यावर त्याला अचानक फोन आणि मेसेज येऊ लागले. त्याने ड्रेसिंग रूममधील संभाषणे लीक केल्याचा आरोप करणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्या होत्या. कोणाशी बोलून आपले स्पष्टीकरण द्यावे, हेच त्याला सुचत नव्हते. मला खूप वाईट वाटले. माझे विमान उतरताच मला फोन आणि मेसेज येऊ लागले. सोशल मीडियावर खूप काही लिहिले जात होते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी संपून 20-25 दिवस झाले होते, असं त्याने सांगितले.

सरफराज खान म्हणाला की, दौऱ्यादरम्यान मला दुखापत झाली होती आणि मी पुनर्वसनासाठी एनसीएमध्ये गेलो होतो. मग अचानक, ड्रेसिंग रूममधील माहिती लीक केल्याच्या आरोपांच्या बातम्या पसरू लागल्या. कोणाशी बोलावे हे मला कळत नव्हते. मी कोणाला सांगू? असे काहीही घडले नव्हते. जर तसे घडले असते, तर माझी इंडिया ‘ए’ संघात निवड झाली नसती आणि श्रीलंका मालिकेसाठीही निवड झाली नसती. ही बातमी कोणी पसरवली हे मला माहीत नाही. मला खूप वाईट वाटले. मी कोणालातरी फोन करायचो, पण कोणीच उचलत नसे.

सरफराजने सांगितले की, मला माझ्या वडिलांसाठी, आईसाठी, पत्नीसाठी आणि भावासाठी वाईट वाटले. सोशल मीडियावर छोट्या छोट्या गोष्टींनाही अवाजवी महत्त्व दिले जाते. मी खूप पूर्वी एक म्हण ऐकली होती: ‘जर तुम्ही कोणाचे काम खराब करू शकत नसाल, तर त्यांचे नाव खराब करा, आणि ते आपोआपच होईल. मला माझा फोन बंद करावा लागला. गौतम गंभीर सरांनी मला दोनदा फोन केला. ते म्हणाले की हे सगळं मूर्खपणाचं आहे, या राजकीय बाबींमध्ये पडू नकोस आणि तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर.

मी त्यांना म्हणालो की ते काय म्हणत आहेत हे मला समजतंय, पण माझे वडील दुःखी आहेत आणि माझी पत्नी रडत आहे. गौतम गंभीर सरांनी माझ्या वडिलांशी बोलून त्यांना अशा गोष्टींना महत्त्व देणे थांबवायला आणि सरफराजला क्रिकेट खेळू द्यायला सांगितले, कारण तो एक चांगला क्रिकेटपटू आहे. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की, जर त्यांना काही मदत लागली तर ते त्यांना फोन करू शकतात. त्यांनीच मला सर्वात आधी फोन केला, असं सरफराज खानने सांगितले.

2024-25 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी सरफराज खान भारतीय संघात होता, पण पाच सामन्यांच्या मालिकेत तो एकही सामना खेळला नाही. या दौऱ्यात भारताचा 1-3 असा पराभव झाला. मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर, भारतीय ड्रेसिंग रूममध्ये तणाव असल्याच्या बातम्या समोर आल्या. गौतम गंभीरने खेळाडूंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केल्याचा दावा या बातम्यांमध्ये करण्यात आला होता. याच काळात, ड्रेसिंग रूममधील गोष्टी बाहेर फुटल्याच्या आणि सरफराजचे नाव समोर आल्याच्या बातम्याही चर्चेत आल्या होत्या. मात्र, सरफराजने आता हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.

Follow Us
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली