Beed : माझा त्या जमिनीशी कसलाही संबंध नाही, नवाब मालिकांविरोधात कोर्टात जाणार-धोंडे

| Updated on: Dec 21, 2021 | 4:46 PM

आष्टीत मंदिर आणि मशिदीच्या जमिनी लाटण्यात आल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार धोंडे यांच्याविरोधात राम खाडे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

Beed : माझा त्या जमिनीशी कसलाही संबंध नाही, नवाब मालिकांविरोधात कोर्टात जाणार-धोंडे
suresh dhas
Follow us on

बीड : माझा त्या जमिनीशी कसलाही संबंध नाही, असे स्पष्टीकरण माजी आमदार भीमराव धोंडे यांनी नवाब मालिकांच्या आरोपावर दिले आहे. नवाब मलिक यांच्याकडे चुकीची माहिती आहे. माझी बदनामी करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच नवाब मलिक यांच्याविरुद्ध कोर्टात धाव घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी माजी आमदार धोंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर जमीनी बळकावल्याचा आरोप केला आहे.

नबाव मलिक यांचे आरोप काय?

आष्टीत मंदिर आणि मशिदीच्या जमिनी लाटण्यात आल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार धोंडे यांच्याविरोधात राम खाडे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच, जो भाजप प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन राजकारण करत आहे. त्याच भाजपचे नेते राज्यात प्रभू रामांच्या मंदिराच्या जमिनी हडपत आहे, असा घणाघाती हल्लाही मलिक यांनी केला.

नेमके प्रकरण काय आहे?

वक्फ बोर्डाच्या 213 एकर जमिनी आहेत. त्यात मशीद इनाम 60 एकर, रुई नलकोल 103 एकर, नवीन निमगाव मशीद ईनाम 50 एकर आणि मशीद आणि दर्गा इनाम अशा 213 एकर जमिनी आहेत. मंदिरांच्या जमिनीही बळकावण्याचं काम आष्टीत झालं आहे. मुर्शीद पूर विठोबा देवस्थान 41 एकर 32 गुंठे, पांढरी तालु आष्टी खंडोबा देवस्थान 35 एकर, श्रीराम देवस्थान, कोयला तालुका आष्टी 29 एकर, चिखली हिंगणी कोयाड श्रीरामदेवस्थान 15 एकर, चिंचपूर रामचंद्र देवस्थान 65 एकर, बेळगाव खंडोबा देवस्थान 60 एकर आणि खडकत विठोबा देवस्थान 50 एकर अशा एकंदरीत 300 एकर जमीन हिंदू देवांची सर्व्हिस इनाम जमीन अधिकाऱ्यांच्या संगनमताने खालसा करण्यात आली आहे. असा आरोप मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

Nagpur Omicron | मेडिकल-मेयोत स्वतंत्र कक्ष, लहान मुलांसाठी टास्क फोर्स

Mumbai: अटलजींच्या जयंतीदिनी भाजपा सुशासन दिन साजरा करणार, मुंबईत नड्डा यांच्या हस्ते वाजपेयींच्या पुतळ्याचे अनावरण

Pune Crime |अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नीच्या विरोधात ईडीकडे तक्रार ; मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन बळकावली