AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange-Pankaja Munde Dasra Melava: पंकजा मुंडे, मनोज जरांगे, सुरेश धस यांचा दसरा मेळावा, राजकीय धुरळा उडणार, संघाचे धनखड यांना निमंत्रण

Manoj Jarange Pankaja Munde Suresh Dhas RSS Dasra Melava: बीड जिल्ह्यात गेल्या तीन चार वर्षांपासून सामाजिक समीकरणं बिघडल्याने राजकीय धुराळा उडाला आहे. आज जिल्ह्यात मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील हे कोणता राजकीय बार उडवून देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर RSS च्या विजयादशमी मेळाव्यातून कोणते बौद्धिक बाहेर पडते याची उत्सुकता आहे.

Manoj Jarange-Pankaja Munde Dasra Melava: पंकजा मुंडे, मनोज जरांगे, सुरेश धस यांचा दसरा मेळावा, राजकीय धुरळा उडणार, संघाचे धनखड यांना निमंत्रण
पंकजा मुंडे, मनोज जरांगे, सुरेश धस यांचा दसरा मेळावा, राजकीय धुराळा उडणार, तर संघाकडून धनखड यांना निमंत्रण
| Updated on: Oct 20, 2026 | 7:39 AM
Share

Manoj Jarange Pankaja Munde Suresh Dhas RSS Dasra Melava Today: मराठवाड्यावर दुष्काळाची गडद छाया आहे. आज बीड विचारांचे सोने लुटणार की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत शिट्या आणि टाळ्यांचे आवाज घुमणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून बीडची सामाजिक वीण पूर्णपणे विस्कटण्याचा प्रयत्न झाला. पण अनेक जण या राजकीय स्पर्धेत बळी गेले नाहीत. त्यांनी सामाजिक सलोखा टिकवण्याचे काम केले. बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी दसरा मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे, नारायणगडावर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील तर आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ गड येथे भाजप आमदार सुरेश धस यांचे मेळावे होत आहेत. त्यात हे नेते कोणते भावनिक आवाहन करतात आणि काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. तर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यात कोणते बौद्धिक होते याचीही उत्सुकता लागलेली आहे.

बीड मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याचे शेकडो एकरवर नियोजन

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पारंपारिक दसरा मेळावा दरवर्षी प्रमाणे यंदाही बीडच्या श्री क्षेत्र नारायण गडावर शेकडो एकरवर होणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली असुन गडाच्या चोहोबाजूंनी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लाखो लोकांच्या राहण्याची, जेवणाची आणि पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेज, साऊंड सिस्टीम आणि इतर नियोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता हा दसरा मेळावा सुरू होणार आहे. जरांगे पाटील उद्या काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान देण्याची गरज असताना सरकारकडून पाच हजार रुपये देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी गेल्या आठवड्यात केली. दसरा मेळाव्यापूर्वी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सोमठाणा गडावरील रेणुका मातेच्या दर्शनानंतर मनोज जरांगे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरून सरकारवर निशाणा साधला.दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलन आणि मोर्चांपासून शेतकऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार हा डाव खेळत असल्याचही त्यांनी म्हटलंय.दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तुटपुंजी मदत नव्हे, तर हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान मिळणे आवश्यक आहे. सरकारचे धोरण शेतकरीहिताचे नसल्याचा आरोप करत, पाच हजार रुपयांसाठी शेतकऱ्यांना बँकांच्या रांगेत उभे राहावे लागणे हीदेखील शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचे जरांगे यांनी म्हटले.

बीडच्या सावरगाव घाट येथील भगवान भक्तिगडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा

बीडच्या सावरगाव घाट येथील भगवान भक्तिगडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, मंत्री मेघना बोर्डीकर, महादेव जानकर, सुजय विखे, माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर होत आहे. सावरगाव घाट येथे या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून मोठ्या संख्येने लोक दसरा मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. तीन ठिकाणी हेलिपॅड तयार, पोलीसांचा मोठा बंदोबस्त सावरगाव घाट मध्ये दाखल झाला आहे.

मंत्री पंकजा मुंडे मेळाव्यापूर्वी काय म्हणाल्या?

मी येथे गोपीनाथ गड स्थापन केला आहे, या ठिकाणी मुंडे साहेबांची समाधी स्थापन केली आहे. देवीचे मंदिर उभे केले आहे, तुळजाभवानी, रेणुकामाता, महालक्ष्मी अश्या देवीचे मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्रीत पंचक्रोशीतील भाविक येत असतात. दर अष्टमी व नवमीला येथे होम हवन करतो. आज मी सकाळी कन्यापूजन केले व मुलींनी सुंदर स्तोत्र सादर केले. त्यांचा आवाज सुंदर होता मी भारावून गेले. या शक्ती आहेत सर्व जगाला या शक्तींनी वाचवले पण आज या कलयुगात या शक्तीला वाचवण्याची गरज पडते त्या निष्पाप आवाजाने स्रोत गायले त्यामुळे मला गहिवरून आले. त्यांना कुणाचीही दृष्ट लागू नये.

जोपर्यंत मी तेथे जात नाही तोपर्यंत मला काहीही सांगता येत नाही देवीच्या कृपेने व लोकांचे प्रेम आहे जे सुचते ते तेथे गेल्यावर सुचते. हा मेळावा माझा नाही लोकांचा आहे हा भगवान बाबांचा आशीर्वाद आहे. तो एक चमत्कार आहे. जसं आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज देत असतो ती एक प्रतिकात्मक रक्कम आहे, त्यांची दिवाळी गोड व्हावी. केंद्राची , राज्याची मदत तसेच इतर मदती हा दिलासा आहे त्यांच्यासाठी. ही अंतिम रक्कम नाही, असे मुंडे म्हणाल्या.

आमदार सुरेश धस यांचा पारंपारिक दसरा मेळावा मच्छिंद्रनाथ गड सावरगावला

आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे सालाबादप्रमाणे उद्या, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या मेळाव्याचे अठरावे वर्ष असून, आमदार सुरेश धस यांच्यासह विविध संत-महंतांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. या मेळाव्यास नाथभक्त आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक परंपरेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, धनखड यांनी निमंत्रण

सरसंघचालक डॅा. मोहन भागवत आज काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. संघाचा विजयादशमी उत्सवात शस्रपुजनाने सुरूवात होणार आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांच्या उपस्थितीत असतील. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या सोहळ्याला दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार. संघाच्या स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. देशातील विद्यार्थी आंदोलने आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती यांसह विविध महत्त्वाच्या विषयांवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत काय भाष्य करणार, याकडे विशेष लक्ष असणार आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष