AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये भीषण अपघात, कंटेनरनं आठ ते दहा वाहनांना चिरडलं

मोठी बातमी समोर आली आहे, बीडच्या केजमध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरनं आठ ते दहा वाहनांना चिरडलं, या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.

बीडमध्ये भीषण अपघात, कंटेनरनं आठ ते दहा वाहनांना चिरडलं
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2025 | 5:28 PM
Share

बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, भीषण अपघाताची घटना घडली आहे.  भरधाव वेगातील कंटेनरने आठ ते दहा वाहनांना धडक दिली, या अपघातामध्ये एक महिलेचा मृत्यू झाला असून, 15 जण जखमी झाले आहेत.  ही घटना बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये घडली आहे. या घटनेनंतर जमाव चांगलाच संतप्त झाला, संतप्त जमावाकडून कंटेनरला आग लावण्यात आली आहे. या घटनेमध्ये कंटेनर जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या केज शहरामध्ये भरधाव वेगातील कंटेनर चालकाने तब्बल आठ ते दहा गाड्यांना धडक दिली. या अपघातामध्ये एक महिला ठार झाली असून,  15 जण जखमी झाल्याची माहिती आहे.  या अपघातामध्ये वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

कंटेनर चालकानं आठ ते दहा वाहनांना धडक दिली,  या अपघातानंतर कंटेनर चालकानं कंटेनरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. कंटेनर केजहून पुढे अंबाजोगाईकडे निघाला. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत हा कंटेनर ताब्यात घेतला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून, 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात  दाखल करण्यात आलं आहे.

वाहनांचं नुकसान 

हा अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरनं आठ ते दहा वाहनांना धडक दिली, या अपघातामध्ये या वाहनांंचं प्रचंड नुकसान झालं आहे. हा अपघात नेमका काशामुळे झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र  भरधाव कंटेनरवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कंटेनरला लावली आग  

भरधाव कंटेनरनं आठ ते दहा वाहनांना उडवलं, या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे तसेच अनेक जण जखमी झाले, वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं. या घटनेनंतर संतप्त जमावानं या कंटेनेरला आग लावली, या घटनेत कंटेनर जळून खाक झाला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...