AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Renuka Shahane: ती लोकं खूप वेडी, काहीही करतील..; रेणुका शहाणे यांच्याकडून चिंता व्यक्त

Renuka Shahane: या घटनेबद्दल बोलताना रेणुका म्हणाल्या की, अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्या, तर लोक घराबाहेर पडतानाही घाबरतील. प्रत्येकाला स्वतःच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करावी लागेल. एखाद्या व्यक्तीच्या हातात शस्त्र असताना ती व्यक्ती काय करेल, याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Renuka Shahane: ती लोकं खूप वेडी, काहीही करतील..; रेणुका शहाणे यांच्याकडून चिंता व्यक्त
Renuka ShahaneImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 22, 2026 | 8:17 AM
Share

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अनेक कलाकारांनी चिंता व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत भयावह असल्याचं सांगत त्यांनी अशा प्रवृत्तींचा मुळापासून नायनाट करण्याची गरज व्यक्त केली. टायगर सुरक्षित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं, मात्र अशा घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही भीती निर्माण होऊ शकते, असा इशारा दिला.

रेणुका शहाणे यांनी टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेबद्दल बोलताना ही अत्यंत भीतीदायक बाब असल्याचं म्हटलं आहे. टायगर सुखरूप असल्याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे केवळ सेलिब्रिटीच नव्हे, तर सामान्य नागरिकांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. आएएनएसशी बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या, “ही खूप भीतीदायक गोष्ट आहे आणि देवाचे आभार मानते की टायगर श्रॉफ सुरक्षित आहे. पण ही दहशत खूप भीतीदायक आहे. इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षांपासून असं काही घडलं नव्हतं. आता आपल्याला हे सर्व पहायला मिळतंय. मला वाटतं की प्रत्येकाने याबद्दल खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. नाहीतर कोणीही घराबाहेर पडणार नाही. प्रत्येकजण सुरक्षेसहच बाहेर पडेल. प्रत्येकजण घाबरून जाईल, कारण अशी कृत्ये करणारी लोकं खूप वेडी असतात. त्यांना काय हवं आहे किंवा त्यांना काय करायचं आहे, हे आपल्याला समजत नाही. त्यांच्या हातात शस्त्रे आहेत. त्यामुळे ही खूप भीतीदायक गोष्ट आहे.”

गुन्हेगारी प्रवृत्तींचा केवळ तात्पुरता बंदोबस्त करून चालणार नाही, तर त्यांचा मुळापासून नायनाट करायला हवा, असं आवाहनही त्यांनी केलं. कायद्याला न जुमानता दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे. 18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात पुष्पा नरसी पार्कजवळ ही घटना घडली. टायगर श्रॉफ फुटबॉल खेळून परतत असताना त्याच्या गाडीच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली होती. या गोळीबारात टायगरला कोणतीही दुखापत झाली नसली तरी त्याचा चालक आणि अन्य व्यक्तींना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं कार्यरत होती. या प्रकरणात राजस्थानमधील कोटा इथून संशयितांना ताब्यात घेतलं.

टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वीही काही कलाकारांना धमक्या मिळाल्याच्या आणि त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या कलाकारांच्या सुरक्षेबरोबरच सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?