Beed NCP | केतकी चितळेविरोधात बीडमध्ये राष्ट्रवादी आक्रमक; गेवराईत घोषणाबाजी करत निषेध

| Updated on: May 15, 2022 | 11:44 AM

केतकीनं पवारांवर फेसबूकवरून वादग्रस्त पोस्ट टाकली. ही पोस्ट अनेकांना खटकली. यावरून सारे एकवटले. केतकीच्या विरोधात सर्वपक्षीय लोकं बोलू लागले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. बीडमध्येही राष्ट्रवादी केतकीविरोधात आक्रमक झाली.

Beed NCP | केतकी चितळेविरोधात बीडमध्ये राष्ट्रवादी आक्रमक; गेवराईत घोषणाबाजी करत निषेध
केतकी चितळेविरोधात बीडमध्ये राष्ट्रवादी आक्रमक
Image Credit source: t v 9
Follow us on

बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियातून (Social Media) अपशब्द वापरल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काल मुंबई पोलिसांनी तिला अटक देखील केली आहे. केतकीच्या विधानावर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. गेवराईतील महिला पदाधिकाऱ्यांनी गोदावरी पात्रात केतकी हिचा दहावा घालत तिचा निषेध केलाय. यावेळी घोषणाबाजी करत तिच्या प्रतिमेला चपला देखील मारण्यात आल्या. गेवराईत निषेध करण्यात आल्याचं शोभा दानवे (Shobha Danve) यांनी सांगितलं. यासंदर्भात शरद पवार म्हणाले, मला कोण व्यक्ती काय बोलली हे माहीत नाही. त्यामुळं याबाबत प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. पण, राज्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र, केतकीविरोधात आक्रमक झाले आहेत.

समता परिषद आक्रमक

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या यांच्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे हिने खालच्या पातळीवर जाऊन सोशल माध्यमात वक्तव्य केलं होतं. आता त्याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये समता परिषद आक्रमक झालीय. शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काय आहे प्रकरण

शरद पवार यांनी साताऱ्यात 9 मे रोजी एक भाषण दिलं होतं. पवार यांनी एका कवितेचा संदर्भ आपल्या भाषणात दिला होता. या कवितेतून हिंदू देव-देवतांबाबत वक्तव्य केलं होतं. यावरून वाद सुरू असताना केतकीनं पवारांवर फेसबूकवरून वादग्रस्त पोस्ट टाकली. ही पोस्ट अनेकांना खटकली. यावरून सारे एकवटले. केतकीच्या विरोधात सर्वपक्षीय लोकं बोलू लागले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. बीडमध्येही केतकीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली.

हे सुद्धा वाचा

केतकीविरोधात अमरावती पोलिसांत तक्रार

अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी अमरावती जिल्हा ग्रामीण महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. केतकी चितळे यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार 500, 501, 505,553-A हे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण महिला अध्यक्ष संगीता ठाकरे यांनी केली.