Video : Chandrapur Fire | विदर्भातील आगसत्र सुरूच, ब्रह्मपुरी शहरातल्या एटीएमला मोठी आग, बँक ऑफ बडोदा एटीएमची हानी

Video : Chandrapur Fire | विदर्भातील आगसत्र सुरूच, ब्रह्मपुरी शहरातल्या एटीएमला मोठी आग, बँक ऑफ बडोदा एटीएमची हानी
ब्रह्मपुरी शहरातल्या एटीएमला मोठी आग
Image Credit source: t v 9

सकाळची वेळ. ब्रम्हपुरीतील देलनवाडी परिसर. या परिसरात बँक ऑफ बडोदाचे एटीएम आहे. हे एटीएम पेटताना दिसले. ही आग पेटताना पाहून लगेच अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. पथक दाखल झाले. तोपर्यंत एटीएम जळाले होते.

निलेश डाहाट

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 15, 2022 | 9:52 AM

चंद्रपूर : विदर्भातील आगसत्र काही संपण्याचं नाव घेत नाही. एकीकंड मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आहे. दुसरीकडं रोज कुठेना कुठेतरी मोठ्या आगी लागत आहेत. ब्रह्मपुरी शहरातल्या एटीएमला (ATMs in Bramhapuri City) मोठी आग लागली. देलनवाडी परिसरातील बँक ऑफ बडोदा एटीएमची हानी झाली. सकाळच्या सुमारास एटीएममधून धूर निघत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. समोरच्या पेट्रोल पंपावरील नागरिकांनी उपलब्ध पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच ब्रह्मपुरी नगर परिषदेचे अग्निशमन (Municipal Fire Brigade) वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोवर प्रचंड आगीमुळे मोठं नुकसान झालं होतं. बँक ऑफ बडोदाच्या शाखेला (Bank of Baroda Branch) लागूनच हे एटीएम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे शहर तापमानाच्या बाबतीत राज्य व देशात अग्रेसर आहे. त्यामुळे आगीच्या घटनांमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

पाहा व्हिडीओ

अशी घडली घटना

सकाळची वेळ. ब्रम्हपुरीतील देलनवाडी परिसर. या परिसरात बँक ऑफ बडोदाचे एटीएम आहे. हे एटीएम पेटताना दिसले. ही आग पेटताना पाहून लगेच अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. पथक दाखल झाले. तोपर्यंत एटीएम जळाले होते. या एटीएममध्ये असलेली रक्कमही जळाली. मात्र, ती किती होती, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

आग लागण्याच्या घटना सुरूच

सहा दिवसांपूर्वी चंद्रपुरातील कचरा डेपोला आग लागली होती. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कचऱ्याची विल्हेवाट लागण्यासाठी उभारलेले शेडही जळून खाक झाले. काल-परवा बुलडाणा येथे दोन ठिकाणी आग लागली. एका आगीत पोलीस स्टेशन परिसरातील कार जळून खाक झाली. दुसऱ्या घटनेत इन्शूरन्स कार्यालयाला आग लागली. या आगीच्या घटनांमुळं मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें