Beed Drowned : सेल्फीचा नाद जीवावर बेतला, नवदाम्पत्यासह मित्राचा धरणात बुडून मृत्यू

ताहा आणि सिद्धीकी यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. दोघेही जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात राहतात. ताहाचे माहेर बीड जिल्ह्यातील कवडगाव वडवणी येथे असल्याने ताहा, तिचा पती सिद्धीकी आणि त्याचा मित्र शादाब हे दोन दिवसांपूर्वी कवडगाव येथे आले होते.

Beed Drowned : सेल्फीचा नाद जीवावर बेतला, नवदाम्पत्यासह मित्राचा धरणात बुडून मृत्यू
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 3:20 PM

बीड : सेल्फीच्या मोहापायी तिघांचा धरणात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीडमध्ये घडली आहे. ताहा सिद्दीकी पठाण (20), सिद्दीकी इनायत पठाण (23) आणि शादाब (22) अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये नवदाम्पत्यासह त्यांच्या एका मित्राचा समावेश आहे. हे तिघे जण माजलगाव धरणाच्या पत्रात फोटो (Photo) सेशनसाठी गेले होते. यावेळी त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले आणि एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात या तिघांचा बुडून मृत्यू झाला. अखेर ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. (Three people drowned while taking a selfie in Beed)

फोटोसेशन करताना तोल जाऊन पाण्यात पडले

ताहा आणि सिद्धीकी यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. दोघेही जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात राहतात. ताहाचे माहेर बीड जिल्ह्यातील कवडगाव वडवणी येथे असल्याने ताहा, तिचा पती सिद्धीकी आणि त्याचा मित्र शादाब हे दोन दिवसांपूर्वी कवडगाव येथे आले होते. शनिवारी दुपारी जेवण आटोपून तिघेही माजलगाव धरणाच्या पात्रात फोटोसेशनसाठी गेले होते. यावेळी त्यांचा तोल गेला आणि एकमेकांना वाचवण्याच्या नादात तिघेही पाण्यात बुडाले.

पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले

तिघे धरणात बुडाल्याची माहिती तात्काळ ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडवणी प्राथमिक केंद्रात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (Three people drowned while taking a selfie in Beed)

इतर बातम्या

Aurangabad Murder | गुढीपाडव्याला दारु पिऊन आले, म्हणून वडिलांची हत्या! मुलानं लोखंडी दांडा डोक्यात हाणला

Sandalwood Smuggler : भोर तालुक्यात नदीपात्रात आढळले चंदनाचे ओंडके, पोलिसांकडून भोरच्या पुष्पाचा शोध सुरू