आयुध निर्माण कंपनीत स्फोट, 8 जण ठार, 7 जखमी, अपडेट जाणून घ्या

Bhandara Ordnance Factory Explosion : भंडारा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटात 7 जण जखमी झाले आहेत. आज सकाळी 11 वाजता हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटामुळे कंपनीचे छत कोसळले. स्फोट झाला त्यावेळी या ठिकाणी 12 व्यक्ती काम करत होते.

आयुध निर्माण कंपनीत स्फोट, 8 जण ठार, 7 जखमी, अपडेट जाणून घ्या
आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट
| Updated on: Jan 24, 2025 | 3:20 PM

भंडारा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झाला. त्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटात 7 जण जखमी झाले आहेत. आज सकाळी 11 वाजता हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटामुळे कंपनीचे छत कोसळले. स्फोट झाला त्यावेळी या ठिकाणी 12 व्यक्ती काम करत होते. यातील दोघांना वाचवण्यात यश आले आहे. दोन जण जखमी झाले.   भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला. दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले. आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरीक भेदरून गेले. या स्फोटाचे कारण काय आहे हे समोर आलेले नाही.

४ किलोमीटरपर्यंत आवाज

या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की, त्याचा आवाज जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत गेला. नागरीक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले, तर काही जण घराबाहेर धावले. भंडारा शहराजवळील जवाहरनगर परिसरात सरकारचा आयुध निर्माण कारखाना आहे. या भीषण स्फोटाने आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले

या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवाहरनगरातील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्सनमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या कंपनीत दारू गोळा तयार करण्यात येतो.

परिसरात धुराचे लोट

या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत पोहचला. अनेकांनी कारखान्याकडे धाव घेतले. 3 ते 4 किलोमीटर पर्यंत आवाज गेला. या स्फोटानंतर भीषण आग लागली. धुराचे लोट दूरवरून दिसत होते. अनेक वाहनधारकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्याच चित्रीकरण केले. साधारणपणे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.

सी सेक्शन २३ क्रमांकाची इमारत

जवाहरनगर येथील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्शन २३ क्रमांकाच्या इमारतीत हा भीषण स्फोट झाला. त्यात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली संवेदना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्फोटाप्रकरणी ट्विट केले आहे.”भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमू सज्ज ठेवल्या आहेत.आतापर्यंत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कोणीच सुरक्षित नाही 

तर भंडारा येथील आयुध कारखाना स्फोटातील मृतांना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी श्रंद्धाजली वाहिली. मोदींच्या सरकार मध्ये कोणी सुरक्षित नाही. हे नरेंद्र मोदी सरकारच फेलूयर आहे. या स्फोटाचा तपास करण्याची मागणी पटोले यांनी केली.  मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले 61 कंपन्या महाराष्ट्रात आणणार आहेत. सर्व उद्योग महाराष्ट्र येतील. 15 लाख कोटींचा इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र येणार आहे.  देवाभूच्या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्र मेळावा घेतला गेला होता. त्यावेळीस 16 लाख कोटीचे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र आले होते परंतु ते कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला.