वाल्मिक कराडला तातडीने ICU त हलवलं, कारण तरी काय? त्याला मारून टाकणार, कुणी व्यक्त केली भीती
Walmik Karad in ICU : संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणात चर्चेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला तातडीने आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रकृतीच्या कुरबुरी सुरू होत्या. त्याला बीडमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणात मोक्का लावण्यात आलेला आरोपी वाल्मिक कराड यांची तब्येत अचानक खालावली. त्याला तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात, ICU मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान वाल्मिक याच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणात त्याला मारून टाकण्याचा धोका असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पोटात दुखत असल्याने आयसीयुत
वाल्मिक कराड याला पोटात दुखत असल्याने तातडीने आयसीयुत दाखल करण्यात आले. काल रात्री त्याला तातडीने बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटदुखीमुळे त्याला लागलीच उपचारांसाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. बुधवारी वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याला बीड येथील कारागृहात ठेवण्यात आले. कराड याच्या पोटात अचानक दुखण्यास सुरुवात झाली. त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे उपाचारासाठी त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.




त्याचा गेम होण्याची भीती
दरम्यान वाल्मिक कराड याला मारून टाकण्याची भीती तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्यांच्या या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. वाल्मिकचा गेम करण्यात येणार असल्याचा आरोप यापूर्वी सुद्धा करण्यात आला होता. त्याच्या एनकाऊंटरची भीती व्यक्त करण्यात येत होती. आता त्याला आयसीयूत दाखल केल्यानंतर पुन्हा त्याच चर्चांना उधाण आले आहे.
वाल्मिक कराडला ऑर्थर रोड तुरुंगात हलवा
वाल्मिकी कराडला ऑर्थर रोड जेलमध्ये आणि जेजे मध्ये ठेवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. छगन भुजबळ या तुरूंगात जशी छातीत कळ यायची तशी वाल्मिकी कराडला येत असेल, त्याच्या सोयीसाठी मेडीकल ग्राऊंड तयार केला जात आहे, असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला.
धनंजय मुंडेंवर निशाणा
महाजेनकोतून आर्थिक लाभ धनंजय मुंडे यांनी घेतला आहे, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. त्यांची आमदारकी रद्द होईल जर कारवाई झाली तर असे त्या म्हणाल्या. घरकुल योजना, कृषी पंप घोटाळा अश्या अनेक घोटाळ्यांचे धनंजय मुंडेंनी आरोप, ८०० रुपयांचा फरक आहे, कित्येक कोटी कमावले आहेत. वाल्मिकी कराड हा घरगडी होता, महागड्या गाड्या, फ्लॅट, जमिनी, लातूरला १० एकर धागा वाईन शॉपसाठी त्याने जमीन घेतली आहे, असे त्या म्हणाल्या. तृप्ती देसाई काय बोलल्या हे माहीत नाही पण वाल्मिक कराडचे हात धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहचत असतील तर व्हिडियो कॉन्फरन्सिंग करा, त्याने तोंड उघडलं तर धनंजय मुंडेंना भोगावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला.