VIDEO : ‘या’ बहिणींच्या कामगिरीचा दिल्ली ते यूरोपपर्यंत डंका, भंडाऱ्यासंह महाराष्ट्राचा झेंडा फडकवला

| Updated on: Apr 11, 2021 | 3:51 PM

सुशिकला आणि दीपाली दोघी सख्या बहिणी निलज खुर्द येथे राहणाऱ्या दुर्गाप्रसाद आगाशे यांच्या मुली आहेत. Sushikala Aagashe Dipali Aagashe

VIDEO : या बहिणींच्या कामगिरीचा दिल्ली ते यूरोपपर्यंत डंका, भंडाऱ्यासंह महाराष्ट्राचा झेंडा फडकवला
भंडाऱ्याची मुलींची प्रेरणादायी गोष्ट
Follow us on

भंडारा: जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात निलज खुर्द हे गाव आहे. पायाभूत सुविधांनी व लोकसंख्येने कमी असलेले हे गाव जिल्ह्याच्या नकाशात शोधतानाही तुम्हाला नाकीनऊ येतील. पण या लहान गावाचं नाव थेट गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते यूरोपीय देशांपर्यंत गाजतयं. हे सर्व निलज खुर्द सुशिकला आणि दीपाली आगाशे या बहिणींमुळं होतं आहे. (Bhandara Sushikala Aagashe and Dipali Aagashe sister success story in sports)

इटली आणि जर्मनीत भारताचं प्रतिनिधीत्व

सुशिकला आगाशे हिला देशापुरते मर्यादित समजून चालणार नाही. या मुलीने युरोपातील इटली आणि जर्मनी यांसारख्या देशातही विविध स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेआहे. तर, दीपाली हिने हॉकी या खेळात राष्ट्रीय स्पर्धेत मोठं नाव केले आहेत. सुशिकला हिने फक्त देशाचे प्रतिनिधीत्वच केलं नाही तर भारताला योग्य स्थानही पटकावून दिले. त्यासोबतच नुकत्याच यावर्षी मार्च महिन्यात हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले, असं सुशिकला हिनं सांगितले.

सुशिकला आणि दीपाली दोघी सख्या बहिणी निलज खुर्द येथे राहणाऱ्या दुर्गाप्रसाद आगाशे यांच्या मुली आहेत. वडील अल्पभूधारक शेतकरी, शेतीतून घर चालवणे बिकट झाल्यामुळे घर बांधण्याच्या कामावर जातात. पण, मुलींना मुलाप्रमाणे त्यांनी वाढवलं. सुशिकलाला सहाव्या वर्गात असताना तिच्यात असलेली खेळाची आवड बघून तिच्या शिक्षकांनी देव्हाडी जवळील तुडका येथे होणार्‍या क्रीडा प्रबोधिनीला जाण्याचा सल्ला दिला, असं तिचे वडील दुर्गाप्रसाद आगाशे यांनी सांगितलं. सुशिकला रोज तिच्या वडिलांबरोबर सकाळी व सायंकाळी तुडका येथील मैदानावर खेळण्याकरिता जायची.

आवडीनुसार दोघींकडून खेळाची निवड

पुढे दोघींनी आपल्या आवडीनुसार खेळाची निवड केली सुशिकला सायकल चालविण्यात पारंगत झाली. सुशिकला आशियाई क्रीडा स्पर्धा,खेलो इंडिया यूथ गेम यांसारख्या अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली.दीपाली हिने हॉकी हा खेळ निवडला. दीपालीनं सुध्दा राज्यस्तरीय हाँकी स्पर्धेत अनेक लहान मोठे पदक पटकवली आहेत.तर तब्बल पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धेत खेळली, असल्याचं दीपाली आगाशे हीनं सांगितलं.

मोठ्या बहिणीचा आदर्श ठेवणारी दीपाली सुशिकलाच्या पावलावर पाऊल टाकत हॉकी खेळत स्वतःचे आयुष्य घडवत आहे. दीपालीनं महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. सुशिकला व दिपाली या दोन्ही बहिणींमध्ये असलेली क्रीडा क्षेत्रातील कुशलता बघता तिच्या गावातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात स्वतःचे करिअर घडविण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या:

पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्या, विजय वडेट्टीवारांची केंद्राकडे मागणी

राज्यात मर्यादित लॉकडाऊनची चर्चा, “कोणाचीही रोजी-रोटी जाईल असा निर्णय घेणार नाही”-नितीन राऊत

(Bhandara Sushikala Aagashe and Dipali Aagashe sister success story in sports)