राज्यात मर्यादित लॉकडाऊनची चर्चा, “कोणाचीही रोजी-रोटी जाईल असा निर्णय घेणार नाही”-नितीन राऊत

prajwal dhage

|

Updated on: Mar 31, 2021 | 6:35 PM

उद्यापासून (1 एप्रिल) नागपूरमध्ये राज्य सराकरकचे प्रोटोकॉल लागू राहतील. राज्य सरकारने सांगितलेले नियम येथे लागू नसतील, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिलीय. (nitin raut nagpur corona)

राज्यात मर्यादित लॉकडाऊनची चर्चा, कोणाचीही रोजी-रोटी जाईल असा निर्णय घेणार नाही-नितीन राऊत
नितीन राऊत
Follow us

नागपूर : मागील काही दिवसांपासून नागपुरात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. येथे रोज 50 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असून येथील आरोग्यंत्रणासुद्धा तोकडी पडू लागली आहे. या सर्व कारणांमुळे येथे कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता उर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. उद्यापासून (1 एप्रिल) नागपूरमध्ये राज्य सराकारचे प्रोटोकॉल लागू राहतील. राज्य सरकारने सांगितलेले नियम येथे लागू नसतील, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिलीय. तसेच, कोणाचीही रोजी-रोटी जाईल असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी जनतेला दिली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Nitin Raut in Nagpur said will not take any decision on Corona which affects labours and common people)

उद्यापासून नागपुरात राज्य सरकारचे प्रोटोकॉल

नागपुरात कोरोना रुग्णांमध्ये रोज हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे. तसेच येथे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडासुद्धा मोठा आहे. या पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी नागपुरातील कोरोना परिस्थितीविषयी महत्त्वाची माहिती दिली. नागपुरात कोणत्याही नियमांत बदल करण्यात येणार नाही. उद्यापासून येथे राज्य सरकाराचे प्रोटोकॉल लागू होतील. तसेच यानंतर येथे जिल्हा प्रशासनाने नियम राहणार नाहीत. त्यामुळे कोरोनाला थोपवण्यात मदत होईल, असे राऊत म्हणाले.

रोजी-रोटी जाईल असा निर्णय नाही

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्यात लाखो स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न निर्माण झाला होता. रोजगारापासून ते त्यांना प्रवासापर्यंतच्या अनेक अडचणींना मजुरांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता पुन्हा लॉकडाऊनचं नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. याविषयी बोलताना कोणाचीही रोजी-रोटी जाईल असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही, असे राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं.

ग्रामीण भागातसुद्धा बेडची व्यवस्था करणार

नागपुरात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे येथे बेड्सची कमतरता भासत आहे. तसी तक्रार मागील अनेक दिवसांपासून केली जात आहे. याविषयी बोलताना “मागील अनेक दिवसांपासून बेड संदर्भात तक्रारी येत आहेत. प्रत्यक्ष रुग्णालयांत जाऊन मी त्याची माहिती घेणार आहे. बेडची व्यवस्था करण्यासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात बेड्सची कमतरता भासत असेल तर तेथेसुद्धा खाटा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, नागपुरात 2885 आणखी नवे कोरोन रुग्ण आढळले आहेत. आज येथे एकूण 1705 जण कोरोनामुक्त झाले असून बाधितांचा आकडा 2,26,038 वर पोहोचला आहे. नागपुरात सध्या 39,331 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे. येथे आतापर्यंत 5098 कोरोनाग्रस्तांचा म-मृत्यू झाला आहे.

इतर बातम्या :

LIVE | बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन, दिग्गज नेत्यांची उपस्थिती

Drug Case | ड्रग्ज प्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर एजाझ खानला अटक, 3 एप्रिलपर्यंत NCB कोठडी

लॉकडाऊन रद्द केल्यानंतरचा जल्लोष भोवला, खासदार इम्जियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल

(Nitin Raut in Nagpur said will not take any decision on Corona which affects labours and common people)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI