Bhiwandi Buidling Collapsed : पत्त्याचा बंगला कोसळावा तशी धाडकन पडली बिल्डींग, दुर्घटनेतील मृतांचा आकडा 8 वर

भिवंडीतील नारपोली येथे 'कोहिनूर' ही धोकादायक चारमजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. रात्रीच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी काही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे. एनडीआरएफ आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे. महापालिकेने धोकादायक ठरवलेल्या या इमारतीत काही नागरिक सामान काढायला गेले होते, तेव्हाच ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.

Bhiwandi Buidling Collapsed : पत्त्याचा बंगला कोसळावा तशी धाडकन पडली बिल्डींग, दुर्घटनेतील मृतांचा आकडा 8 वर
भिवंडीत इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू
| Updated on: Jul 31, 2026 | 9:57 AM

भिवंडी येथे एका चारमजली धोकायदायक इमारत कोसळल्याने मोठी खळबळ माजली. भिवंडी महापालिका क्षेत्रातील नारपोली गंगाराम वाडी परिसरात काल रात्रीच्या 11.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ‘कोहिनूर’ नावाची ही धोकादायक इमारत होती. रात्रीच्या सुमारास ती कोसळून मोठी दुर्घटना झाली. एखाद्या पत्त्याचा बंगला जसा कसोळतो, तशी ही इमारत खाली कोसळली आणि क्षणार्धात भुईसपाट झाली. यामुळे मोठा गदारोळ माजला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते, दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, बचाव पथकातील अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना जीव गमवावा लागला असून या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढूनआता 8 वर पोहोचला आहे. तर आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून बचाव पथक तसेच एनडीआरएफचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. जवळपास 10 -11 तासांपासून ढिगारा उपसण्याचे आणि खाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचा काम सुरू आहे. कोहिनूर ही इमारत महापालिका प्रशासनाने आधीच धोकादायक ठरवली होती, मात्र काही जण तिथे सामान काढण्यास गेले होते. मात्र काल रात्री ही इमारत कोसळल्यानंतर क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली, त्यांचा संसार तर मोडलाच पण आप्तस्वकीयांना गमवावं लागल्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

5 जणांचा मृत्यू

रात्री 11.30 च्या सुमारास ही 4 मजली इमारत कोळली आणि एकच हाहाकार माजला. दुरुस्तीचे काम सुरू असताना खालचे पिलर हलवल्यानंतर इमारत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  त्यानंतर आजूबाजूचे रहिवासी, नागरिक यांनी मदतीसाठी धाव घेतली, तसेच पोलीस बचाव पथकाचे अधिकारी यांनाही माहिती दिली. त्यानंतर एडीआरएपची टीमही घटनास्थळी दाखल आझले. आधी या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 3 ते 4 जण अडकल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र नंतर तो आकडा वाढल्याची भूीती व्यक्त करण्यात आली . नारपोली गंगाराम वाडी परिसरात असलेल्या ही इमारत रिकामी करण्यात आली होती. मात्र काही रहिवासी त्यांचे सामान, साहित्य काढण्यास गेले होते, त्यावेळीच ही इमारत पडल्याने ते अडकले.

धूळ, सिमेंट, ढिगाऱ्याकालून नागरिकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तब्बल 12 तासानंतर या ढिगाऱ्याखालून 8 वा मृतदेह एनडीआरएफच्या टीमने बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 8 मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढल्यानंतर पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.  ते मृतदेह शवविच्छेदनासाठी, भिवंडीतील आय जी एम सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे समजते. अजूनही काही कामगार आणि नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता; शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.  एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल आणि भिवंडी महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी बचावकार्यात गुंतले आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us