
राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. आज राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. उद्या महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना आतापासूनच या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज अजित पवारांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का दिला आहे. एका बड्या नेत्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरण बदलताना दिसणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. या निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी भाजपाला मोठा दणका दिला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे आणि लोकशक्ती परिवाराचे प्रमुख मनोहर डोंगरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्तांसह बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी या सर्व नेत्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यामुळे पक्षाला आणखी बळकटी मिळाल्याची भावना अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील माजी जिल्हाध्यक्ष श्री. मनोहरभाऊ डोंगरे तसंच जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती श्री. विजयराज डोंगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी… pic.twitter.com/h7iElGUgzj
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 15, 2026
मोहोळसह सोलापूरच्या इतर तालुक्यांमध्येही लोकशक्ती परिवाराचा चांगला प्रभाव आहे. मनोहर डोंगरे हे पूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांना मानणारा वर्ग आहे. आता लोकशक्ती परिवाराने भाजपाची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीपूर्वी हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आगामी काळात राजकीय गणितं बदलणार आहेत.
दरम्यान, निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होईल. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी 27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर जाहीर केली जाणार आहे. मतदान 5 फेब्रुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल. मत मोजणी आणि निकाल 7 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.