AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! शरद पवारांना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश

Sharad Pawar NCP : नाशिकमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढली आहे.

मोठी बातमी ! शरद पवारांना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
Nitin BhosaleImage Credit source: X
| Updated on: Jan 06, 2026 | 4:32 PM
Share

संपूर्ण राज्यात सध्या 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले होते. आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. राज्यातील प्रमुख नेते दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहे. त्याचबरोबर अनेक पक्षांमध्ये इनकमिंगही पहायला मिळत आहे. अशातच आता नाशिकमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढली आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पक्षप्रवेशाचा परिणान आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

अनेक पदाधिकाऱ्यांच्या हाती भगवा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशनचे सचिव राजेंद्र लिंबाळते, नाशिक ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचे प्रशांत ठाकरे, युवराज भोसले, सचिन सोनवणे, प्रसाद आंबेकर, अनुप भोसले, पृथ्वीश भोसले यांचा समावेश आहे. यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढली आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढली

नितीन भोसले यांच्यासह माजी महापौर अशोक मुर्तडक व माजी महापौर दशरथ पाटील आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. अशोक मुर्तडक आणि दशरथ पाटील हे दोघेही काही काळापूर्वी भाजपमध्ये सामील झाले होते. मात्र उमेदवारी डावलल्यामुळे अशोक मुर्तडक यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच