AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! प्रतिभा चाकणकरांना दणका, खरात प्रकरणात ईडीकडून समन्स; सखोल चौकशी होणार

Pratibha Chakankar : अशोक खरात प्रकरणाच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ED) प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावले आहे. हा तपास 'समता पतसंस्थे'शी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे.

मोठी बातमी! प्रतिभा चाकणकरांना दणका, खरात प्रकरणात ईडीकडून समन्स; सखोल चौकशी होणार
Pratibha Chakankar EDImage Credit source: Google
| Updated on: May 01, 2026 | 11:02 PM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेक महिलांनी तक्रारी दिल्या असून सध्या खरातची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीत भोंदू खरात हा जादूटोणा करत असल्याचेही समोर आले होते. तसेच त्याने समता पतसंस्थेत मोठा आर्थिक गैर व्यवहार केल्याचे समोर आले होते. खरातचे अनेक राजकीय व्यक्तींशी संबंध होते अशीही माहिती समोर आली होती. भोंदू खरातप्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी महिला प्रेदेशाध्यक्षपद आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतक त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचेही नाव या प्रकरणात समोर आले होते. अशातच आता प्रतिभा चाकणकर यांना मोठा दणका बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रतिभा चाकणकर यांना ईडीकडून समन्स

भोंदूबाबा अशोक खरातने समता पतसंस्थेमधील खात्यांच्या माध्यमातून पैशांची उलाढाल केल्याचे समोर आले होते. राहाता येथील समता पतसंस्थेमध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्याच्या नावाने असलेल्या चार खात्यांतून तब्बल 2 कोटी 40 लाखांची उलाढाल झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं. या सर्व खात्यांना अशोक खरात हा नॉमिनी होता. याच प्रकरणाच्या तपासासाठी प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावण्यात आलं आहे. यात प्रतिभा चाकणकर यांनी मुंबईतील झोन 2 च्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. या चौकशीतून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

प्रतिभा चाकणकरांनी आरोप फेटाळले

काही दिवसांपूर्वी प्रतिभा चाकणकर यांनी आर्थिक व्यवहाराचे आरोप फेटाळत आपल्या नावाने बनावट खाती उघडण्यात आल्याचा दावा केला होती. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांची संयुक्तपणे 8 तास चौकशी केली. या चौकशीत त्यांच्या पैशांचा स्रोत काय आहे आणि अशोक खरात यांच्याशी त्यांचा आर्थिक व्यवहारांचा नेमका काय संबंध आहे हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणी थेट ईडीचे अधिकारी आता प्रतिभा चाकणकर यांची चौकशी करणार आहेत. यातून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!