मोठी बातमी! बड्या नेत्यानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ, शिवसेना ठाकरे गटाला धक्का, उद्या भाजपात मोठा पक्षप्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत, दरम्यान आता पुन्हा एकदा आणखी एक मोठा धक्का पक्षाला बसला असून, उद्या भाजपात मोठा पक्षप्रवेश होणार आहे.

मोठी बातमी! बड्या नेत्यानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ, शिवसेना ठाकरे गटाला धक्का, उद्या भाजपात मोठा पक्षप्रवेश
उद्धव ठाकरे
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 19, 2025 | 9:26 PM

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता, हेच चित्र आता महापालिका निवडणुकीमध्ये देखील पहायला मिळत आहे.  भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. याचा मोठा फटका हा महाविकास आघाडीला बसला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून,  ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे.  माजी आमदार सुभाष भोईर हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार सुभाष भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  2014 मध्ये शिवसेना पक्षाकडून सुभाष भोईर कल्याण ग्रामीण मधून निवडून आले होते. 2019 मध्ये शिवसेना पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांना  2024 मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट देण्यात आलं. ते  शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्याविरोधात उभे होते, या निवडणुकीत त्यांचा पराभव  झाला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना लोकसभा संपर्क प्रमुख पद देखील देण्यात आलं होतं, मात्र नंतर त्यांचं हे पद काढून घेण्यात आलं. दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं होतं, या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीची वाट धरली, भाजप आणि शिवसेना शिंदे गटात अनेकांनी पक्षप्रवेश केला, दरम्यान हे पक्षप्रवेश अजूनही सुरूच असल्याचं दिसत आहे. पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचं मोठं आवाहन आता महाविकास आघाडीपुढे आहे.