मोठी बातमी! या बड्या बँकेवर सर्वात मोठा सायबर हल्ला; महाराष्ट्रात मोठी खळबळ, थेट 3 लाख 75 हजार…, तुमचंही खांत आहे का?

देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या डिजिटल सुरक्षेलाच सायबर हल्लेखोरांनी आव्हान दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून, ग्राहकांची चिंता वाढली आहे.

मोठी बातमी! या बड्या बँकेवर सर्वात मोठा सायबर हल्ला; महाराष्ट्रात मोठी खळबळ, थेट 3 लाख 75 हजार..., तुमचंही खांत आहे का?
बँकेवर मोठा सायबर हल्ला
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 5:33 PM

देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या डिजिटल सुरक्षेलाच सायबर हल्लेखोरांनी आव्हान दिल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत समोर आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीबीडी बेलापूर येथील ग्लोबल आयटी सेंटरमधील सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश करून तब्बल 3 लाख 75 हजार रेकॉर्ड्स चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चोरी करण्यात आलेला डेटा डार्क वेबवर प्रसारित केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2026 या सहा दिवसांच्या कालावधीत ही सायबर घुसखोरी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. एसबीआयच्या YONO 2.0 आणि RAAS या महत्त्वाच्या ॲप्लिकेशन्समधील 32 CSV फाइल्स, दोन JSON फाइल्स आणि तब्बल 2 हजार 721 PDF फाइल्स चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

Loading...

बँकेच्या आयटी यंत्रणेत झालेल्या या कथित घुसखोरीमुळे ग्राहकांच्या डिजिटल माहितीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, चोरी झालेल्या रेकॉर्ड्समध्ये नेमकी कोणती ग्राहक माहिती आहे आणि तिचा गैरवापर झाला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी एसबीआयच्या अधिकाऱ्याने बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात हॅकर्सविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हल्ल्यामागे कोणाचे नेटवर्क आहे, डेटा नेमका कुठे आणि कसा वापरला गेला, याचा तपास बेलापूर सिबिडी पोलीस करत आहेत.

ग्राहकांची चिंता वाढली

दरम्यान नवी मुंबईमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर हल्लेखोरांनी थेट बँकेच्या सर्व्हरवरच मोठा सायबर हल्ला केला आहे. तीन लाख 75  हजार रेकॉर्डची चोरी झाली आहे, त्यामुळे आता ग्राहकांची देखील चिंता वाढली आहे. परंतु  चोरी झालेल्या रेकॉर्ड्समध्ये नेमकी कोणती ग्राहक माहिती आहे आणि तिचा गैरवापर झाला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या प्रकरणात तक्रार प्राप्त होताच गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाची चक्र फिरवण्यात आले आहेत. हा टेडा डार्क वेबवर प्रसारित केल्याचा आरोप होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us