शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

| Updated on: Sep 29, 2022 | 11:49 PM

रात्री उशीरा हे बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. हे सर्व क्लास वन लेव्हलचे अधिकारी आहेत. 

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
Follow us on

मुंबई : सत्तेत आल्यापासून शिंदे-फडणवीस सरकराने धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावला आहे. अशातच आज शिंदे-फडणवीस सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या(IS officer transfer) केल्या आहेत. रात्री उशीरा हे बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. हे सर्व क्लास वन लेव्हलचे अधिकारी आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली झाली आहे.  ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर, अशोक शिनगारे यांची ठाणे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आलेय.

अनुप कुमार यांची अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे. जयश्री भोज यांची महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय येथे बदली करण्यात आली आहे.

लीना बनसोड यांची अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास ठाणे या पदावर बदली झाली आहे. संजय खंदारे यांची प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय येथे बदली करण्यात आली आहे.

निलेश गटने यांची मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे येथे बदली झाली आहे. तर, डॉ प्रदिपकुमार व्यास यांची अप्पर मुख्य सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे.

ए.आर. काळे यांची अन्न व औषध प्रशासन मुंबई येथे बदली करण्यात आलेय. तर, डॉ विपिन शर्मा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई येथे बदली झालेय.