भाजपचे बडे नेते नाशिकमध्ये; महापालिकेसाठी लावला जोर!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 13, 2021 | 11:31 AM

महापालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना नाशिकमध्ये भाजपने जोर लावला असून, आज शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसह चार बड्या नेत्यांच्या फळीने हजेरी लावली आहे.

भाजपचे बडे नेते नाशिकमध्ये; महापालिकेसाठी लावला जोर!
चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे.
Follow us

नाशिकः महापालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना नाशिकमध्ये भाजपने जोर लावला असून, आज शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसह चार बड्या नेत्यांच्या फळीने हजेरी लावली आहे.

काहीही करून नाशिक महापालिकेवर सत्ता ठेवायची असा चंग भाजपने बांधला आहे. त्यानुसार त्यांच्या साऱ्या राजकीय खेळी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नाशिकमध्ये येऊन योजनांच्या घोषणांची माळ दिवाळीपूर्वीच फोडली. त्यात लॉजिस्टिक पार्क ते उड्डाणपूल वगैरे वगैरे घोषणांचा समावेश होता. त्यानंतर भाजपच्या बड्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त हजेरी लावली. आता पुन्हा एकदा थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन आणि जयकुमार रावले ही बडी मंडळी शहरात येत आहेत. महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या भाजपमध्ये सध्या अंतर्गत कलही उफाळून येत आहे. काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या मुद्द्यावरून भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिकेवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर त्यांनी शहरातील खड्डे भरण्यावरून पुन्हा एकदा महापालिकेतील सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. इतकेच नाही, तर या खड्डे भरण्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणीच थेट महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली. त्यांनी आयुक्तांना एक खरमरीत पत्र लिहिले. या पत्राची चर्चा अजूनही सुरू आहे. हा वाद शमतो न शमतो तोच महापालिकेतील सभागृह नेते कमलेश बोडखे यांनी आपल्याच सत्ताधाऱ्यांवर रस्त्यांच्या प्रश्नांवरून टीकेच्या फैरी झाडल्या. शहरात रस्ते बुजविण्याच्या कामाची चौकशी त्रयस्थांमार्फत करण्याची मागणी केली. दुसरीकडे विद्युत विभागावरून भाजपचेच नगरसेवक मुकेश शहाणे आणि महिला व बालकल्याण योजना रखडल्यामुळे स्वाती भामरे आक्रमक झाल्या. त्यानंतर जगदीश पाटील यांनी टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. या साऱ्या पार्श्वभूमीवर गलितगात्र आणि घनघोर यादवी सुरू झालेल्या पक्षात प्राण फुंकण्याचे काम पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहे.

(Big leaders of BJP will inaugurate various development works in Nashik today, fielding for municipal elections)

इतर बातम्याः

मालेगाव भीषण शांत, माथेफिरूंनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर, संशयितांची धरपकड

VIDEO | त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ सुरु असलेल्या मालेगावात बंदला गालबोट, आंदोलकांकडून दगडफेक

अखेर साहित्य संमेलन आयोजकांना उपरती; वाढत्या रोषानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश


Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI