AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगाव भीषण शांत, माथेफिरूंनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर, संशयितांची धरपकड

त्रिपुरातल्या कथित घटनेने मालेगावमध्ये माथेफिरूंनी अक्षरशः हैदोस घातल्याचे उघड झाले आहे. त्यांनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघात हल्ला केला. पोलीस उपअधीक्षकांच्या सुरक्षारक्षकावर कटरने वार केले. या भीषण घटनेत अधिकाऱ्यांसह दहा जवान जखमी झाले झालेत.

मालेगाव भीषण शांत, माथेफिरूंनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर, संशयितांची धरपकड
मालेगावमध्ये काल माथेफिरूंनी केलेल्या हल्ल्यात दहा पोलीस जखमी झाले आहेत.
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 10:44 AM
Share

नाशिकः त्रिपुरातल्या कथित घटनेने मालेगावमध्ये माथेफिरूंनी अक्षरशः हैदोस घातल्याचे उघड झाले आहे. त्यांनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघात हल्ला केला. पोलीस उपअधीक्षकांच्या सुरक्षारक्षकावर कटरने वार केले. या भीषण घटनेत अधिकाऱ्यांसह दहा जवान जखमी झाले झालेत.

त्रिपुरा येथे घडलेल्या कथित घटनेच्या निषेधार्थ मालेगावमध्ये शुक्रवारी बंद पुकारण्यात आला. मात्र, या बंदमध्ये काही माथेफिरूंनी अक्षरशः हैदोस घालून शहराला वेठीस धरले. सुमारे पाचशे जणांच्या जमावाने जुना आग्रा रोड, बसस्थानक, किदवाई रोडवर नंगानाच केला. हॉटेल, दुकाने, घरांवर दगडफेक केली. पोलिसांच्या वाहनांनाही सोडले नाही. या भीषण अराजकाच्या एकेक घटना आज समोर येत आहेत. अपर पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी, शहर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी कर्मचाऱ्यांसमवेत या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संशयितांनी प्रचंड दगडफेक केली. जवळपास अडीच तास हा भयाण हैदोस सुरू होता. त्यात काही संशयितांनी पोलीस उपअधीक्षक दोंदे यांच्या सुरक्षारक्षकावर कटरने हल्ला केला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस नाईक सूर्यवंशी यांच्यावर बेछूट दगडफेक करत प्राणघातक हल्ला केला. या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी, सात जवान जखमी झाले. पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली असून, आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतल्याचे समजते. दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये विविध संघटनांसह शाही मशिदचे इमाम आणि शहर-ए-खतीब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लीम समाज व्यावसायिकांनी शांततेत बंद पाळला.

पालकमंत्र्यांचे शांततेचे आवाहन

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शांततेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, त्रिपुरातील घटना दुःखदायी आहे. त्याचा निषेध. मात्र, या देशात काही जण जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना बळी पडू नये, मालेगावमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस तैनात आहेत. आता नागरिकांनी शांतता पाळावी. कसल्याती अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

मालेगाव येथील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्या ठिकाणी दंडाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व संयम बाळगावा. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

(Malegaon is extremely quiet, mob reveals deadly attack on three police officers, arrest of suspects continues)

इतर बातम्याः

VIDEO | त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ सुरु असलेल्या मालेगावात बंदला गालबोट, आंदोलकांकडून दगडफेक

अखेर साहित्य संमेलन आयोजकांना उपरती; वाढत्या रोषानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...