राजकारणात मोठी खळबळ! भाजपाला जबर धक्का, संपूर्ण कार्यकारिणीचा तडकाफडकी राजीनामा; कोकणात प्रचंड असंतोष

BJP : कोकणात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सावंतवाडीमध्ये महिला शहर अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीने राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राजकारणात मोठी खळबळ! भाजपाला जबर धक्का, संपूर्ण कार्यकारिणीचा तडकाफडकी राजीनामा; कोकणात प्रचंड असंतोष
Big Blow For BJP in Konkan
Image Credit source: Google
| Updated on: Jun 06, 2026 | 7:20 PM

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नाराज नेत्यांनी पक्षांतर केल्याचेही समोर आले आहे. महाविकास आघाडीचे बरेच नेते महायुतीतील पक्षात सामील झाल्याचे पहायला मिळाले आहे. म्हणजेच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग होत आहे. अशातच आता कोकणात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सावंतवाडीमध्ये महिला शहर अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीने राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोकणात खळबळ उडाली आहे. राजीनाम्यानंतर महिला नेत्यांची नाराजीही समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मोहिनी मडगावकर यांचा राजीनामा

कोकणात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी मधील भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीने लडकाफडकी राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष तथा नगरसेविका मोहिनी मडगावकर आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत दुफळीमुळे हा राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण कार्यकारिणीने राजीनामा दिल्याने हा पक्षाला मोठा हादरा मानला जात आहे.

मी माझ्या पदाला न्याय दिला…

मोहिनी मडगावकर यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, ‘माझा कार्यकाळ पूर्ण झाला नव्हता, मात्र मला सांगण्यात आलं की तुम्ही पद सोडा, हे पद आम्ही दुसऱ्या कुणाला देऊ. माझं हे म्हणणं आहे की, कार्यकारिणी बदलायची असेल तर संपूर्ण जिल्ह्याची बदला आणि माझी पण बदला. फक्त सावंतवाडीचं बदललं तर लोक विचार करतील की यांचच पद का गेलं. मी माझ्या पदाला न्याय दिला आहे. मी नगरसेविका म्हणून काम करत आहे. मी अनेक कार्यक्रम यशस्वी करून दाखवले आहेत.’

पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त

पुढे बोलताना मडगावकर यांनी, ‘संपूर्ण कार्यकारिणीनेही राजीनामा दिला आहे. मला सोबतच्या महिला सांगत होत्या की राजीनामा देऊ नका, तुम्ही राजीनामा दिला तर आम्ही इथे काम करणार नाही. तुम्ही आहात म्हणून इथे आम्हाला मान सन्मान मिळत आहे. काही लोक बाहेरू येतात आणि इथे हस्तक्षेप करतात. आमचे जिल्हाध्यक्ष त्यांचं ऐकून चुकीचा निर्णय घेतात, हे चुकीचं आहे. त्यांनी कुणीतरी सांगत आहे की हिला काढून टाका, दुसऱ्याला पद देऊया हे करण चुकीचं आहे’ असं म्हणत पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली आहे. यातून सिंधूदुर्गमध्ये भाजपात सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

Follow Us